Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भूत कसं दिसतं हे पाहण्यासाठी मुलाने केली घरातील 4 जणांची हत्या

Spread the love

केरळ: आजपर्यंत आपण चित्रपटांमध्ये पाहिलं आहे की भूत कसं दिसतं, पण जेव्हा हा प्रश्न मनात येतो तेव्हा कोणाचं काय होतं, याचं भयानक उदाहरण काही वर्षांपूर्वी केरळमध्ये घडलं होतं. आत्मा कसा दिसतो हे पाहण्यासाठी घरातील मुलाने आई-वडील आणि बहिणीसह घरातील 4 जणांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर त्याला अजिबात पश्चाताप नव्हता.

केरळच्या नंथनकोड हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला होता. 9 एप्रिल 2017 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरममधल्या नंथनकोड भागातल्या एका घरात चार मृतदेह आढळून आले. तिथे निवृत्त प्राध्यापक ए. राजा थंकम (60), त्यांची पत्नी डॉ. जीन पद्मा (58), मुलगा केडल जीनसन राजा (30), मुलगी कॅरोलीन (26) आणि ललिता नावाच्या एक नातेवाईक (70) हे राहत होते.

राजा थंकम यांनी दोन्ही मुलांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. मुलगी काही दिवसांपूर्वी शिक्षण संपवून भारतात परत आली होती. मुलगा केडल मात्र तिथे होता. तो स्किझोफ्रेनियाचा रुग्ण बनला होता.

आत्मा कसा दिसतो, मेल्यानंतर आत्मा कसे काम करतो, आत्म्याला पाहता येते का अशा विचित्र प्रश्नांनी त्याच्या मनात घर केले होते. तो सतत याचाच अभ्यास करायचा. त्याची अभ्यासातली रुची संपली होती. कसे तरी शिक्षण संपवून तो भारतात परतला.

हत्येचा कट आखला

भारतात आल्यावरही तो कायम त्या प्रश्नांवर संशोधन करत राहायचा. घरच्यांशी फारसा बोलायचा नाही. बाहेर जायचा नाही. दिवसरात्र खोलीत असायचा. कोणालाही खोलीत येऊ द्यायचा नाही. त्याची मानसिक स्थिती मानसोपचार तज्ज्ञांनाही दाखवण्यात आली. तिथे त्याने तज्ज्ञांनाही तेच प्रश्न विचारले. उपचार घेऊनही त्यांचा त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. कालांतराने त्याच्या डोक्यातले हे खूळ निघून जाईल, असा विचार पालकांनी केला.

तो घरात राहून आत्म्याबाबत संशोधन करतच राहिला. एके दिवशी त्याने विचित्र निर्णय घेतला. एखाद्याला डोळ्यांदेखत मारले, तर त्याच्या शरीरातून आत्मा कसा बाहेर पडतो हे पाहता येईल, असा त्याने विचार केला. त्याकरिता त्याने हत्येचा कट आखला.

मागे वळून पाहताना क्षणार्धात आत्मा निघून गेला…

पहिली निवड आईची केली. 6 एप्रिलच्या दिवशी घरात केडल, त्याची आई आणि ललिता हे तिघेच होते. केडल आधी आईच्या खोलीत गेला, तेव्हा आई पलंगावर झोपली होती. केडलने आईवर तीक्ष्ण हत्याराने वार करायला सुरुवात केली. तसे न करण्यासाठी आईने वारंवार विनवणी केली; मात्र तो वार करतच राहिला.

खोलीतून आरडाओरडा एकून ललिता तिथे आल्या. समोरचे दृश्य पाहून स्तब्ध झाल्या. त्याही किंचाळल्या. केडलने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले. पुन्हा आईकडे नजर वळवली. तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. त्याला वाटले मागे वळून पाहताना क्षणार्धात आत्मा निघून गेला असेल. यामुळे तो ललिता यांच्याकडे वळवला. त्यांनाही केडलने त्याच पद्धतीने मारून टाकले; पण त्याला आत्मा कुठेच दिसला नाही.

या दोन्ही हत्या केल्यानंतर 3-4 तास तसेच गेले. आत्मा का दिसला नाही, याचा तो विचार करत बसला होता. तेवढ्यात त्याचे वडील राजा थंकम आणि बहीण कॅरोलीन घरी आले. ते पाहून केडलने आत्मा पाहण्यासाठी वडिलांवर वार केले आणि त्यांना संपवले.

तरीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्याने बहिणीलाही मारून टाकले. त्यानंतर तीन दिवस तो त्या मृतदेहांसोबत घरीच राहिला. त्याला वाटले, तीन दिवसांनी आत्मा शरीरातून बाहेर पडेल; मात्र 9 एप्रिलला जेव्हा मृतदेहातून वास येऊ लागला, तेव्हा तो घाबरला. यात आपण अडकले जाऊ अशी भीती त्याला वाटली, म्हणून त्याने मृतदेहांचे छोटे छोटे तुकडे केले. नंतर संपूर्ण घरात आग लावली आणि स्वतः पळून गेला.

माणसाच्या शरीराचे तुकडे जळताना आढळले

घराला लागलेली आग पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना आत माणसाच्या शरीराचे तुकडे जळताना आढळले. घरातलेच लोकं असते, तर अशा प्रकारे त्यांचे तुकडे जळले नसते असा विचार पोलिसांनी केला.

तपासणी केली असता त्यांचा मृत्यू जळल्याने झाला नाही, तर त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. घरात कोण कोण राहायचं याबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून एक व्यक्ती गायब असल्याचे पोलिसांना कळले.

केडलच्या वर्तनाबाबतही पोलिसांना शेजाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे केडलवरच संशयाची सुई जात होती. पोलिसांनी थोड्याच दिवसांत केडलला पकडले. केडलनंही पोलिसांसमोर सगळं कबूल केले.

विशेष म्हणजे ते सांगतानाही केडलच्या चेहऱ्यावर हसू होते. त्याला अजिबात पश्चात्ताप झाला नव्हता. आत्मा कसा दिसतो ते पाहण्याकरिता हत्या केल्याचे तो वारंवार सांगत होता. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केल्यावर न्यायालयाने केडलला तुरुंगात पाठवले. केरळमध्ये या हत्याकांडाची बरीच चर्चा झाली.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!