Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत केलेल्या भ्रष्टाचाराची कारवाई करण्यात यावी शरद पवारांचे आव्हान

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या 10 वर्षात संविधानावर आधारित लोकशाहीची चिंता वाटू  लागली आहे. मोदी सरकारचा राज्यांबाबतचा दृष्टिकोन असहकाराचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्र सरकारने केला. हा भ्रष्टाचार उघड करून कारवाई करावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी दिले.

Advertisements

महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते. दरम्यान, ज्याप्रमाणे शेतात वाढलेले तण उपटून फेकतो तसे हे सरकार उखडून टाकावे लागेल.देशात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून पाहात नाही. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही…

केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या आणि ते म्हणतात की ही ‘मोदी की गॅरंटी’ आहे परंतु त्यांच्या गॅरंटी कार्डावर तारीख नाही. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याबद्दल घृणा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जवाहरलाल नेहरू यांनी देशात संसदीय लोकशाही मजबूत केली, जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली, संपूर्ण जग हे मान्य करत आहे. पण मोदी मान्य करत नाहीत. माईक हातात मिळाला की नेहरुंवर टीका करतात, या शब्दांत शरद पवारांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, मोदी सरकारने शेतकरी, तरुण महिला अशा सर्वांना फसवले. या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. २०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत.

बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहे, हे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!