Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनाव संदर्भात महत्वाची सुनावणी, कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले खडेबोल

Spread the love

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजून निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमुर्ती विश्ननाथन यांच्या खंडपीठासमोर राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनाव संदर्भात महत्वाची सुनावणी पार पडली.

या सुनावणीत कोर्टाने निवडणुक आयोगाला निर्देश दिले तर अजित पवार गटाला खडेबोल सुनावले असल्याची वृत्त आहे. सर्वोच्च न्यायालयात आज शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या. मराठा आरक्षणाबाबत उद्या विशेष अधिवेशन होत आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकांची छपाई करावी लागणार आहे. त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येईल ते निवडणुकीपुरता कायम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच अजित पवारांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि चिन्ह पुन्हा कायम स्वरूपासाठी देण्यात यावे, असे देखील सिंघवी कोर्टात म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार गटाने नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू द्या अशी विनंती केली. तर अजित पवार गटाकडून वकिल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.

यावेळी कोर्टाने रोहतगी यांना उद्देशुन म्हटले की, मुकुल रोहगती तुम्ही लक्षात घ्या. आदेशात काय लिहिले आहे ? दोन्ही गटानी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरले नाही. असे म्हणत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्यात मुदत दिली आहे.

तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं यावेळी दिले.

अजित पवार गटाला पक्ष अन् चिन्ह बहाल

दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि चिन्ह कोणाचे? यावर निकाल दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही बहाल करण्यात आले.

यानंतर १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना ते अजित पवार गटालाच दिले. तसेच तांत्रिक तृटींचा दाखला देत दोन्ही गटांचे आमदारही पात्र ठरवले. पण हा निकाल पक्षपती असल्याचा आरोप करत शरद पवार गटाने या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!