Manoj Jarange Live : थेट नवी मुंबईतून जरांगे पाटील बोलत आहेत ….आजच्या रात्री आम्हाला सगळे आदेश द्या…आजची रात्र इथेच काढू …सगळे मराठे मुंबईकडे निघा .

उद्या दुपारी १२ पर्यंत वाट बघतो . सगळ्यांनी इथेच थांबावे . पण सरकारने ऐकले नाही तर नंतर मात्र थांबणार नाही … सरकारला इशारा. कुणीही आता तिकडे जाऊ नका.
१. ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत त्यापैकी ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप केले आहेत असे सरकार सांगत आहेत . हे प्रमाणपत्र कुणाला दिल्या आहेत ? याचे उत्तर द्या . पण अर्ज करा असे सरकार सांगत आहे. चर्चेला सगळे अधिकारी होते.
२. त्याच आधारावर त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या … आधी ५४ लाख नोंदी मिळाल्या असे सांगत होते .
३. नोंदी मिळालेल्या लोकांनी हा माझा सोयरा आहे असे १०० रुपयाच्या बॉन्डवर प्रमाण पत्र दयायचे आहे आणि त्याच प्रमाणपत्रावर लगेच प्रमाणपत्र द्या . १०० रुपयाच्या बॉंड ची परवानगी द्या . सरकार हो म्हणलं …
४. आणखी एक खुटी राहिली : एक मुख्य मागणी सगळ्यांना आरक्षण द्या .
५. गुन्हे मागे घेण्याची तयारी करा . तसे पत्र काढा. त्यासाठी सरकारने एक समिती गठीत केलीय…
६. क्युरिटिव्ह पिटिशन चा निकाल लागून आरक्षण मिळेपर्यंत सर्व मराठा मुलांना शिक्षण मोफत करा.
७. मुलींना के जी टू पीजी शिक्षण मोफत / मुलांना नाही ही खुंटी ठोकलीच . सर्वांना १०० टक्के शिक्षण मोफत करा …
८. आरक्षण मिळेपर्यंत आमच्या राखीव जागा कायम ठेवा .
९. सगळे करतो म्हणतात पण जीआर काही अजून दिसत नाही.
१०. सग्या सोयऱ्यांची आपली मुख्य मागणी आता राहिली आहे.
११. ईसीबीसी बाबत आदेशात म्हटले आहे की , रखडलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे आदेश ४, १७२ उमेदवारांना याचा फायदा होईल असे आदेश देण्यात येत आहेत.
१२. गॅझेट लागू करा . मराठवाड्यातला सर्वच मराठा कुणबी आहे. या आधारावर महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या . एकही मराठा आरक्षणाशिवाय राहता कामा नये …
१३. आजच्या रात्री आम्हाला सगळे आदेश द्या. आम्ही कायद्याचा सन्मान करतो , सरकारचा , प्रशासनाचा आदर करतो . तुम्ही जर काही खरंच केलं असेल तर आजच्या आज आदेश द्या…
आजपासून सकाळी ११ वाजता पाणी पिऊन उपोषण सुरु केलय . मी समाजासाठी मारायला भीत नाही. मुंबईकरांनो माझ्या समाजाच्या माणसाला पिण्यासाठी पाणी द्या …
मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या . सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्या आज इथे थांबतो नाही तर उद्या मुंबईकडे निघतो. मला डाटा पाहिजे आणि जे ठरलाय ते त्याचे अध्यादेश पाहिजेत.
सगळे मराठे मुंबईकडे निघा .
सगळे इथेच थांबा . कुणालाही आपल्याला त्रास द्यायचा नाही . मुंबईतले सगळे बांधव आपलेच आहेत . सगळे शांत राहा …
आम्हाला अध्यादेश द्या . आझाद मैदानावर काय आम्हाला घरं बांधायचेत का ?
माझा निर्धार पक्का . आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही …