मराठा मोर्चा मुंबईत येण्यापूर्वीच मनोज जरांगेंना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. २६ तारखेपासून मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे उच्च न्यायालयाने जरांगेंना आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशा मागणीची याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आंदोलनाच्या वेळी रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास ट्रॅफिकचे काय होईल? असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी युक्तिवाद करताना केला. दरम्यान, आम्हाला आंदोलनाच्या परवानगीसाठी कोणतेही पत्र आले नाही, असे महाअधिवक्त्यांनी यावेळी सांगितले.
न्यायालयाने मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून आझाद मैदानात ५ हजार पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी सांगितले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली आहे.
हायकोर्टाच्या या नोटीस आदेशानंतर मनोज जरांगे-पाटील याचे उत्तर
हायकोर्टाच्या या नोटीस देण्याच्या आदेशानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. मराठा आंदोलकांच्या वतीने आमचे वकील कोर्टात जातील. काय आहे ते बघतील. त्यानंतर नोटिशीचं काय करायचे ते बघू , असे सांगत न्यायमूर्ती आम्हाला न्याय देतील, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.
Maratha Aarakshan LIVE Updates : 24 जानेवारी रोजी मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी…
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now : 9421379055 | 9028150765