Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण… कसा असेल सोहळा?

Spread the love

अयोध्येतील रामललाच्या अभिषेक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी पंतप्रधान मोदी ५ तास अयोध्येत राहणार आहेत. सकाळी 10.25 वाजता ते अयोध्येला पोहोचतील. तर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ते अयोध्येत असतील. पंतप्रधान मोदी सुमारे अकरा वाजता रामजन्मभूमी परिसरात पोहोचतील. एक तास रामजन्मभूमी परिसरात राहणार आहे. त्यावेळी गर्भगृहासमोरील परिसरात ८ हजाराहून जास्त विशेष आमंत्रित असणार आहेत. त्या लोकांना १० वाजेपर्यंत परिसरात येण्यास सांगितलं आहे.

दुपारी 12:50 ते 12:55 या वेळेत उद्घाटन सोहळा होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. यावेळी रामललाचे डोळे उघडण्यात येतील. पंतप्रधान मोदी काजळ लावतील आणि आरसा दाखवतील.

दरम्यान, राम मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अयोध्येत दुपारी 1 ते 2 या वेळेत पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे. यासोबतच सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही भाषण होईल.

पंतप्रधान मोदी दुपारी 2:10 वाजता रामजन्मभूमी परिसरातील कुबेर टिळा येथील शिवमंदिरात पोहोचतील. कुबेर टिळा आणि शिव मंदिर येथे दर्शनालय भाविकशांतीसाठी खास रॅम्प तयार केला आहे.

श्री रुद्रमयालमध्ये अयोध्या महात्म्य खंडात देवी पार्वती आणि शंकर यांच्यातील संवादात ज्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे त्यापैकी रामकोट क्षेत्रांतर्गत श्री राम जन्मभूमीसह ४३ पौराणिक ठिकाणे आहेत. यात कुबेर टीलासुद्धा आहे.

प्राचीन परंपरेत या ठिकाणाला नवरत्न म्हटलं जात होतं. याठिकाणीच श्री विष्णूचे अवतार कुबेर हे रामाचे सेवक म्हणून विराजमान आहेत. अयोध्येत वैभव आणि धनाचे प्रतिक म्हणून ते उभा आहेत. इथेच एक जटायूची मूर्ती उभारली आहे. या मूर्तीला पंतप्रधान मोदी श्रद्धांजली वाहू शकतात.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Maratha Aarakshan Rally LIVE Updates:

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!