Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Congress Bharat Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी केला हल्ला…

Spread the love

आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात रविवारी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला झाला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आले. काँग्रेसचा आरोप आहे की, पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेसोबत आलेल्या पत्रकारांशीही झटापट करण्यात अली आहे. दरम्यान या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेचा आज चौथा दिवस असून, ही यात्रा विश्वनाथ जिल्ह्यातून सोनितपूरमार्गे नागावला जाणार आहे. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या संपर्क समन्वयक महिमा सिंग यांनी सांगितले की, जयराम रमेश आणि इतर काही लोकांची कार जामुगुरीघाटजवळ न्याय यात्रेत सामील होत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. याची माहित पोलिसांना देण्यात आली असून आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक घटनास्थळी वेळेत आल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले आहे.

बसवर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेत्याने सांगितले की, हल्लेखोरांनी वाहनावर भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा लावण्याचा प्रयत्न केला, आणि न्याय यात्रेचे स्टिकर्स त्यांच्या वाहनातून काढून टाकण्यात आले यामुळे वाहनांची मागील काच फुटली आहे.

दरम्यान यात्रा कव्हर करणाऱ्या एका ब्लॉगरचा कॅमेरा, बॅज आणि इतर उपकरणे हिसकावण्यात आली होती. सिंह यांनी सांगितले की, या भागात भाजपचा कार्यक्रम सुरू होता आणि काही फुटेज दाखवण्यासाठी मीडियाची टीम त्यांच्या वाहनातून खाली उतरली त्यांच्या सोबत देखील गैरवर्तन करण्यात आले.

काँग्रेस नेते म्हणाले की, त्यांनी आमच्यासाठी अतिशय भयावह परिस्थिती निर्माण केली होती. त्यांनी ब्लॉगरचा कॅमेरा परत करण्यास नकार दिला आणि कॅमेरा हिसकावला नसल्याचा दावा केला.

राहुल गांधी समोर मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हल्ल्यानंतर राहुल गांधींसमोर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या, त्यानंतर राहुल गांधी बसमधून खाली उतरले आणि त्यांच्या दिशेने गेले. नंतर याच व्हिडिओमध्ये राहुल गांधी मोदींचा नारा देणाऱ्या कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहेत.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Maratha Aarakshan Rally LIVE Updates:

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!