Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी

Spread the love

कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केला असून 15 जानेवारी पर्यंत ग्रामीण भागात कोणतेही मोर्चे, आंदोलन, धरणे आंदोलन किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठका घेण्यास मनाई असणार आहे. तसेच, यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, जिल्ह्य प्रशासनाने आणखी एक आदेश काढला आहे. जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 च्या उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा तसेच शांतता क्षेत्र वगळून) ध्वनिची विहित मर्यादा राखून 15 दिवस शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यानुसार सन 2024 मध्ये शिथिलता द्यावयाचे 15 दिवस निश्चित करण्यात आले असून, या दिवशी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्गमित केले आहेत.

निश्चित केलेले दिवस :

  1. शिवजंयती 19फेब्रुवारी

  2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल

  3. श्रीगणेश चतुर्थी 7 सप्टेंबर

  4. ज्येष्ठागौरी पूजन 11 सप्टेंबर

  5. अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर

  6. ईद ए मिलाद 16 सप्टेंबर

  7. अष्टमी 11 ऑक्टोंबर

  8. नवमी 12 ऑक्टोंबर

  9. दिवाळी (लक्ष्मीपूजन) 1 नोव्हेंबर

  10. ख्रिसमस 25 डिसेंबर

  11. नवीन वर्ष 31 डिसेंबर

या शिवाय उर्वरित चार दिवस राखीव असून, कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सूट दिली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

धक्कादायक, १७ वर्षांच्या मुलीवर केला 26 वेळा सामूहिक बलात्कार

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!