Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : जपानमध्ये लँडिंग करताना विमानाने पेट घेतला , दुसऱ्या विमानाला घासल्याने आग लागल्याचा संशय …

Spread the love

टोकियो : जपानमध्ये लँडिंग करताना विमानाला आग लागली. टोकियो विमानतळावर ही घटना घडली. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जपानी वृत्तसंस्था एनएचकेने अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. एनएचकेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याचा संशय आहे.

https://twitter.com/SkyNews/status/1742120474165883299?

अनेक परदेशी माध्यमांनी या घटनेचे फुटेज प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये विमानाची खिडकी स्पष्ट असून तिच्या खालून ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. जपानी मीडियानुसार आग लागलेल्या फ्लाइटचा नंबर जेएएल ५१६ होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. जपान एअरलाइन्स फ्लाइट ५१६ जपानी स्थानिक वेळेनुसार १६:०० वाजता न्यू चिटोस विमानतळावरून निघाली आणि १७:४० वाजता हानेडा येथे उतरणार होती.

अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण ३६७ लोकांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याच वेळी, जपान तटरक्षक दलाने सांगितले आहे की जेएएल ५१६ ची टक्कर झालेल्या विमानातील पाच क्रू सदस्य बेपत्ता आहेत, वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!