Assam Accident : देवदर्शनाला निघालेल्या बसचा भीषण अपघात 14 जणांचा मृत्यू

आसाममधील डेरगावमध्ये भीषण अपघात झाला आहे या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण गंभीर जखमी आहेत. आज (3 जानेवारी) सकाळी 45 जणांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली आणि हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बसमधील जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आणि स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. अपघातातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळ बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसमधील सर्व 45 जण सहलीसाठी जात होते. आसाम तिनसुकियामधील तिलिंगा मंदिरात दर्शनासाठी जायचे होते,
मात्र वाटेत डेरागाव येथे बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली आणि दोन्ही वाहानांचा चक्काचूर झाला. तसेच, बसमधील 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधून प्रवास करणारे इतर 27 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिकांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव
बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर मोठा आवाज आला, आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस येण्यापूर्वीच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
बसमधील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात पाठवले. बसमधील सर्व प्रवाशांना जवळच असलेल्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी डॉक्टरांनी 14 जणांना मृत घोषित केले आणि इतर 27 जणांवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते. देवदर्शनासाठी निघालेली बस आसममधील डेरगावजवळ एका कोळशाने भरलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. हा ट्रक मार्गेरिटा येथून येत होता, अपघाताच्या वेळी दाट धुकं होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765