Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Israel-Hamas War: स्टारबक्स कॉफी कप टेबलवर ठेवल्याने न्यूज अँकरला नोकरीवरून काढून टाकले

Spread the love

इस्रायल-हमास युद्ध : इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीपासून जगातील बहुतेक मुस्लिम देश इस्रायलच्या विरोधात गेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक देश इस्रायलच्या आक्रमकतेला वेगवेगळ्या प्रकारे विरोध करत आहेत. यामध्ये तुर्कियेचेही नाव आहे, जो इस्रायलच्या विरोधात आहे. दरम्यान, तुर्कस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे एका महिला अँकरने बातमीपत्र सुरू असतांना टेबलावर स्टारबक्स कॉफी कप ठेवल्याने नोकरीवरून काढून टाकले आहे.

तुर्कीच्या टीव्ही न्यूज चॅनेलने 45 वर्षीय अनुभवी न्यूजकास्टर मेल्टेम गुने आणि कार्यक्रम संचालक यांना ताबडतोब नोकरीवरून काढून टाकले आहे. तुर्की टेलिव्हिजन ग्रुपने ही माहिती दिली आहे.

इस्तंबूलस्थित मीडिया कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, तुर्कीचे लोक इस्रायल-गाझाबाबत संवेदनशील आहेत याची त्यांना जाणीव आहे. तो तुर्कस्तानसाठी असे निर्णय घेत राहील, ज्यामुळे त्यांच्या भावना दुखणार नाही.

तुर्की टीव्ही न्यूज चॅनेलची महिला अँकर प्रसिद्ध असून एक पुरस्कार विजेती अँकर आहे.  मात्र, स्टारबक्सचा वाद समोर आल्यानंतर तिला काढून टाकण्यात आले आहे. इस्तंबूल-आधारित मीडिया कंपनीने एक निवेदन दिले की आम्ही तुर्कीच्या लोकांना दुखावू अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. आम्ही अँकर आणि कार्यक्रम संचालक यांना काढून टाकले आहे असून  याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला दिले नवे आदेश


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!