Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मॉस्को कॉन्सर्ट हॉलवर 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला 70 जणांचा मृत्यू १०० हून अधिक जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (22) सकाळी 5 लढाऊ पोषाख परिधान केलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरवून गेले आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रमाणेच हा देखील दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

Advertisements

लष्करी गणवेश घातलेले दहशतवादी इमारतीत घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. जो समोर दिसत होता त्याला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर स्फोट झाला, त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली होती.

Advertisements
Advertisements

https://x.com/Wanmohnev/status/1771320817022013761?s=20

दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

ISIS ने आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक निवेदन जारी केले आहे. आमच्या सैनिकांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला. हल्लेखोर सुरक्षितपणे त्यांच्या तळांवर परतले आहेत, असे आयएसने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, रशियन मीडियाने दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे की, हल्लेखोर ‘आशियाई आणि कॉकेशियन’ लोकांसारखे दिसत होते. हल्लेखोर परदेशी भाषेत बोलत होते. दहशतवादी इंगुशेतियाचे मूळ रहिवासी असल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या वेळी क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये जवळपास ६ हजार लोक उपस्थित होते. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हल्लेखोरांचा शोधून खात्मा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!