Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Assembly Election Results 2023 : २०२४ च्या निवडणुकांवर या निकालांचा परिणाम होणार नाही : शरद पवार

Spread the love

सातारा : आजच्या निकालात मध्यप्रदेश , राजस्थान , छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने आघाडी घेतली असली तरी या निकलाचा परिणाम २०२४ च्या निवडणुकांवर होणार नाही तसेच  महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. मात्र सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत . आजच्या चार राज्यांच्या निकालावार आपली प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले  की , आजच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेन्ड सध्या दिसतोय हे मान्य केला पाहिजे. मंगळवारी ६  वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएमला दोष देता येणार नाही.

दरम्यान तेलांगाना बद्दल बोलताना ते म्हणाले की ,  बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणर आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला मात्र परिणाम झाला आहे. राहुल गांधीच्या निकालानंतर तेथे कॉंग्रेसच्या विजयाची खात्री होती. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र नवीन लोकांना संधी द्यावी असा तीकडचा ट्रेन्ड दिसत आहे.

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे

यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की  , मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत त्यावर एकमत झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये सर्वांची भूमिका  होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे.कुणाच्या ताटातून न देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संसदेत जाऊन काही गोष्टी करायला हव्या आहेत. अधिवेशनात या संदर्भात काय होतं याकडे लक्ष आहे. दरम्यान मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होतात हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने या प्रकरणात लक्ष घातले पाहिजेत, असे देखील शरद पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!