Assembly Election Results 2023 : मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रातीक्रिया ….

मुंबई /रायगड: भाजपने तीन राज्यात सत्ता प्राप्तीच्या दिशेने वाटचाल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले असून भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे तर येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. आधी घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता ‘मन मन मोदी’ असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आपल्या रायगड दौऱ्यात अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.
महाराष्ट्राला एक नंबर करण्याचे काम करीत आहोत…
कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजत पवार म्हणाले.
गावबंदी आंदोलन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याच काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करू नये.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा आम्ही निवडून आणणार आहोत.
मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न पण जनेतेने साथ दिली : मुख्यमंत्री
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदींचा करिष्मा, लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केलं . मोदींना हरवण्यासाठीइंडिया आघाडी एकत्र आली आहे. २०२४ मध्ये इंडिया आघाडीचे पानिपत होईल.
नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शाह यांनी केलेल्या नियोजनामुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली. राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. कर्ज माफ करू असे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. कर्नाटकमध्ये देखील असे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
२०१४ मध्ये मोदींवर नको नको ते आरोप केले पण मोदी निवडून आले. २०१९ मध्ये चौकीदार चोर आहे असे आरोप केले पण मोदी निवडून आले . आता मोदींविरधात देखील इंडिया आघाडी एकत्र आली आहे पण मोदी निवडून येतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे पानीपत होणार आहे.
Assembly Election Results 2023 : २०२४ च्या निवडणुकांवर या निकालांचा परिणाम होणार नाही : शरद पवार
महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
For News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765