Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Cyclone Michaung Update : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे 144 ट्रेन रद्द, काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Spread the love

Cyclone Michaung Update: 

 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हे चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे.

( Cyclone Michaung ) या चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही (Indian Railway) झाला आहे. दरम्यान, 144 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक ट्रेनचा मार्घ बदलण्यात आले आहे.

 

Cyclone Michaung Update : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नई, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशसह आसपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

तसेच पुढील 48 तासांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने आत्तापर्यंत 144 गाड्या रद्द केल्या आहेत.

 

‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या भागात 90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने (India Meteorological Department) वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यांतील परिस्थितीची माहिती घेत तयारीचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवामान खात्याने आज उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळ  तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहोचले आहे.

या काळात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान मिचॉन्ग चक्रीवादळ धडकण्याची भीती व्यक्त केली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी, कराईकल आणि यानम भागात 4 डिसेंबरला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तामिळनाडू, चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफ टीमला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. येथे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांनी पेरंगलाथूर जवळील पीरकंकरनई आणि तांबरम भागातील सुमारे 15 लोकांना शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे वाचवण्यात आले आहे.

 

Assembly Election Results 2023 : मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रातीक्रिया ….


महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

For News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!