Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईव्हीएमच हटविण्यासाठी जनमत तयार करावे लागेल, प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती …

Spread the love

सांगली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत . पत्रकारांशी बोलताना ,  ईव्हीएमच्या मुद्दयांवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की , ” ईव्हीएमचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. ४३० हून अधिक उमेदवार ईव्हीएममध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. उमेदवारांची संख्या त्याहून अधिक वाढल्यास बॅलेट पेपरशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे ईव्हीएमच हटविण्यासाठी जनमत तयार करावे लागेल “.

दरम्यान आपल्या सांगली दौऱ्यात  प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला सल्ला देताना म्हटले आहे की , आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव कारणासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे. हे न पाहता मुस्लिम म्हणून मतदान करण्यास सांगितले आहे. यासाठी मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी याबाबत मुस्लिम नागरिकांमध्ये जागृत करावी असे देखील आंबेडकर म्हणले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी सत्ता संपादन सभे निमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या वेळी त्यांनी मिरजेतील मिरासाहेब दर्गास भेटी दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्यासह मुस्लिम समाजा सोबत अनेक घडामोडीवर चर्चा केली. त्यामुळे ‘वंचित’कडून मिरजच्या जागेबाबत मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बोले जात आहे. यापूर्वी आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिल्यानंतर मिरज विधानसभेच्या या जागेवर वंचित बहुजन आघाडी दावा करण्याची शक्यता आहे.

या दौऱ्याच्या  दरम्यान, मिरजेत त्यांनी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व नागरिकांची बैठक घेतली. त्यावेळी आंबेडकर म्हणले, ‘‘देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास हिटलरशाही सुरू होईल. हिटलरने “ज्यू” लोकांसमवेत जे केले, ते आरएसएस तुमच्या सोबत करेल. त्यांच्या नजरेत सर्व लोक गुलाम आहेत. हे सर्व रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने पक्षनिहाय मतदान न करता भाजप विरोधात निवडून येण्यास सक्षम असलेल्या उमेदवाराला मतदान करावे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे .” यावेळी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, नजीर झारी, मेहबूब मणेर आदी उपस्थित होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!