Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

OBCNewsUpdate : हिंगोलीच्या मेळाव्यात ओबीसी नेत्यांची जरांगे पाटील यांच्यावर तूफान टीका …

Spread the love

हिंगोली : हिंगोलीत झालेल्या ओबीसी सभेत आज ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर बरीच टीका केली . या सभेत बोलताना राज्याचे पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ  यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे  यांचा समाचार घेतला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येत असून  यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये तर दुसरी सभा आज हिंगोलीत झाली. या सभेत  छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेत्यांनीही जरांगे यांच्यावर टीका केली.

डोक्याचे जेवढे केस पिकले तेवढी आंदोलने केलीत …

“आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझे आई वडील देखील म्हातारे असतील. माझ्या डोक्याचे जेवढे केस पिकले आहे, तेवढी आंदोलने मी केली आहेत. दोन्ही बाजूने अडचणीत आणले जात आहे. एकीकडे कुणबी आरक्षण द्या हे सुरू आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आणि ओबीसींचं आरक्षण काढून घ्या म्हणत आहे,असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की , मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करतो. त्याच्या १५  सभा सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केले खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात आहे. आम्ही कधी एक टायर जाळला का? त्यांनीचं पेटवले, असेही भुजबळ म्हणाले.

सर्वांना आदरांजली अर्पण

“काल 25 नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिदिन झाला. याच दिवशी कसाबने मुंबईवर हल्ला केला. यात अनेकांनी आपला जीव गमावला. तसेच आज संविधान दिवस असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तुम्हाला लिहण्याचं, बोलण्याचा अधिकार दिला. त्यामुळे या सर्वांना आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे म्हणत,” भुजबळ यांनी आदरांजली वाहिली.

ओबीसींना विरोध करणाऱ्यांचे हातपाय तोडू : बबनराव तायवाडे

मागील तीन महिन्यापासून राज्यात दोन समाजात संघर्ष सुरू आहे. ओबीसींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही संघर्ष करतोय. मंडळ आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला फॅारवर्ड कास्ट म्हटलंय. एकाही आयोगाच्या अहवालात मराठा मागास असल्याचे सांगितले नाही. ओबीसींनी आमचं 70 वर्षापासून चोरलं असल्याचं म्हटलं जातं. पण कुठे चोरलं ?

आतापर्यंत सात अहवाल झाले पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचे सांगितले गेले नाही आणि हा  आमची लायकी काढत आहे, आमची लायकी काढणारे हा  कोण आहे. आमची लायकी नाही तर, मग आमच्या पंक्तीत कशाला येऊ लागले आहे. यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. यापुढे ओबीसींच्या विरोधात कोणी बोलल्यास त्यांचे हातपाय कापून ठेवू. तसेच मनोज जरांगे याचा जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख बनवत आहे आम्हाला . एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही: लक्ष्मणराव गायकवाड

मंडल आयोगाच्या वेळी जे घरे  जाळत होते, ते आज ओबीसीमध्ये का येत आहे. भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका. पुढच्या वर्षी मराठ्याचा एकही आमदार निवडून येणार नाही. इडा पिडा टळू दे ओबीसीचा राज्य येऊ दे, एक मराठा लाख मराठा एक मराठा गरीब मराठा करु,…मी गरीब मराठा याना सांगू इच्छितो १००  जेसीबीने फुल वाहण्यापेक्षा जरांगे यांना पैसे द्या आणि ज्यामुळे त्याचा संसार सुखी होईल, असे लक्ष्मणराव गायकवाड म्हणाले.

अन्यथा आम्ही हातात दंडुके घेऊ: टी पी मुंडे

आमचे घर पेटवून देण्यासाठी कोणी येत असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जाणीवपूर्वक आम्हाला खवळू नका. ऊस तोड कामगारांच्या हातात ऊस तोडताना काय असते हे जाणून घ्यावे, आपल्याला कोणी धक्का द्यायला आला तर त्याला उंच पाडा, तुम्ही दंडलशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हातात दंडुके घेऊ, चिलत्या जरांग्या कुवत काय तुझी, तमाशे नाचवत फिरले आणि जमिनी विकल्या. पोलीस बहिणीला तुम्ही दगडाने मारतात, असे टी पी मुंडे म्हणाले.

आम्ही कमांडर आहोत: महादेव जानकर

छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इथे मुख्यमंत्री म्हणून आला असता. छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. ओबीसीने ठरवलं तर खासदार किंवा आमदार होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती लढायच्या नाही. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांनी पार्टी काढली म्हणून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण, महाराष्ट्र कोण चालवतंय? कुणाच्या मागे तिकीट मागतो, भुजबळ साहेब कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना यायचं ते येईल.

भुजबळ साहेब पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना सोबत घेतलं पाहिजे. भुजबळ साहेब तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत. त्यांच्यासोबत युती करणार नाही. पैशाला कमी नाही. 100 वंजाऱ्याला सांगेल, 1 कोटी रुपये द्या, जमा होतील. भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे महादेव जानकर म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!