Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WeatherNewsUpdate : राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचे संकेत तर डिसेंबर महिन्यात हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचे आगमन

Spread the love

मुंबई :  डिसेंबरच्या आगमनाने संपूर्ण उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज 27 नोव्हेंबर, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीतही हवामान बदलेल. आयएमडीने सोमवारी दिल्लीत रिमझिम आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

यासोबतच कमाल तापमानातही घट नोंदवली जाणार आहे. हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, सध्या पश्चिम हिमालयात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील अमरेली, भावनगर, सुरत, तापी, डांग, वलसाड, नवसारी येथे पावसाचा अंदाज आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक हिमवृष्टी सुद्धा पाहता येईल.

विशेष म्हणजे यापूर्वी  हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवून 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला होता . मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती त्यानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. काल रात्रीही महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे या राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. या आठवड्याच्या अखेरीस देशभरात थंडी वाढेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्याचवेळी डिसेंबरमध्ये दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात थंडी आपला जोर दाखवू शकते.

दक्षिण भारतात पाऊस पडत आहे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज तामिळनाडूच्या कांचीपुरम, रानीपेट आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने गुजरातच्या किनारपट्टी भागात 50 किमी वेगाने वाऱ्याचा आणि पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातमधील सुरत, नवसारी, वलसाड, दाहोद, गिरसोमनाथ, जुनागढ, महिसागर, भावनगर, जामनगर, तापी, डांग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल.

राज्यातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारांचाही पाऊस झाला आहे. काल (रविवारी) संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट दिला होता. आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात आज बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमान मध्येही वाढ कायम आहे. विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!