Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WeatherNewsUpdate : राज्यात पुढील ४८ तासात काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

मुंबई : आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रासह देशाच्या या भागांत हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होईल आसे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान राज्यातील अनेक भागातून मान्सून परतला असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असताना यामुळे तापमानात घट होण्याचाही अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने देशासह राज्यात काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील ४८ तासांत कोकणसह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रविवारी कोकण किनारपट्टी भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता झाली आहे. याशिवाय पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!