Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भाविकांच्या मिनी बसला भीषण अपघात, 12 ठार 20 जखमी…

Spread the love

औरगाबाद : औरंगाबाद मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर नाजिक  मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  १२ प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत . बुलढाणा येथून  सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन हे भाविक नाशिककडे  परत येत असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला. यात लहान बालके आणि महिलांचा देखील समावेश आहे. 

प्राथमिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन परत येत असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.

टेम्पो ट्रॅव्हल (MH20 GP 2212) आणि ट्रक (MP09 MH 6483) यांची टक्कर होऊन हा अपघात झाला. ही वाहने छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात होते. समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबा यांचं दर्शन घेऊन शिर्डीला जात होते.

नाशिक येथील काही भाविक हे सैलानी बाबा दर्ग्याच्या दर्शनाठी गेले होते. हे भाविक एका टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने गेले होते. गाडीमध्ये तब्बल ३० भाविक होते. हे सर्व जण समृद्धी महामार्गाने परत येत असतांना रात्री दीड च्या सुमारास त्यांची ट्रॅव्हलर बस ही समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चक्काचूर झाला. यात १२ प्रवाशी जागीच ठार झाले तर इतर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नवे समजू शकली नाही. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारार्थ औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे तर जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की पोलिसांनी एका ट्रकला थांबवले होते . हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. पोलिसांनी मात्र अद्याप या अपघाताबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

अपघातातील मृतांची नावं

1) तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक)
2 ) संगीता विलास अस्वले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक)
3 ) अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)
4 ) रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक)
5 ) काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)
6 ) रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)
7 ) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक)
8 ) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक)
9 ) अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे)
10 ) सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे)
11 ) मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक)
12 ) दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक)

जखमींची नावे

1) दगू सुखदेव म्हस्के
2) गौतम भास्कर तपासे
3) कार्तिक नावाचा लहान मुलगा
4) शांताबाई नामदेव मस्के
5) दुर्गा लहान मुलगी
6) धनश्री लखन सोळसे
7) लखन शंकर सोळसे
8) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन
9) श्रीहरी दीपक केकाने
10) सम्राट दीपक केकाने
11) संदेश संदीप अस्वले
12) अनिल साबळे
13) प्रकाश हरी गांगुर्डे
14) तन्मय लक्ष्मण कांबळे
15) संदीप रघुनाथ अस्वले
16) युवराज विलास साबळे
17) गिरजेश्वरी संदीप अस्वले
18) पूजा संदीप अस्वले
19) वैशाली संदीप अस्वले
20) ज्योती दीपक केकडे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहवेदना

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन अपघातातील मृतांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. तसेच, अपघाताबद्दलची अपडेट माहितीही दिली. त्यांनी म्हटले आहे की , छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

२० जखमींपैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. ६ जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!