Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : छगन भुजबळ यांचे जरांगे पाटलांना उत्तर , मला टार्गेट करण्याचे कारण काय ?

Spread the love

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या गावात सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढच्या गोष्टी सरकारच्या हातात नसतील असा इशारा दिला आहे. तसेच या सभेत बोलताना छगन भुजबळ यांचे नाव न घेता आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांनी टीका केली आहे. यासंदर्भात आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिले आहे.

जरांगे पाटील यांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले की , माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक मराठा नेत्यांसह काम केले. माझेही काहीतरी योगदान आहे. मला मात्र आज मराठ्यांनी मोठे केले असे सांगत शिव्या दिल्या जातात. मात्र मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठे केले . मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्या फूट पडणार नाही.”

जीव जाणार असेल तरीही..

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना मला जीवे मारण्याची धमकी आली असल्याचेही म्हटले आहे. नाशिकमध्ये त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. “मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाहीस, तुझी वाट लावू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत. मात्र अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. मी यासंदर्भातली तक्रार पोलिसांकडे की आहे. आता पोलीस पुढचं पुढे काय ते बघतील.” असं भुजबळ म्हणाले आहेत.

मला टार्गेट करण्याचे कारण काय ?

शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले , असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठे हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केले आहे. माझे देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे. मी जरांगेचे काय खालले आणि जरांगे आता कुणाचे खातो आहे हे त्याने सांगावे. मराठा समाजाला ओबिसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे असे मराठा नेतेही म्हणतात मग मला टार्गेट करण्याचे कारण काय ? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!