Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

}MarathaReservationNewsUpdate : २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला, जरांगे पाटील यांचा विराट सभेत इशारा …

Spread the love

आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात विराट सभा पार पडली. जवळपास तासभर केलेल्या भाषणात सरकारवर सडकून टीका केली. एकंदर जरांगेनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. जरांगे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला ठरवण्यात येणार आहे. नाही दिले तर पुढची जबाबदारी सरकारा आहे. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की , मराठा समाज एकत्र होत नाही हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीने उत्तर दिले आहे. कोण म्हणते मराठा एक होत नाही सरकारला आजच्या गर्दीने उत्तर दिले आहे.घराघरातून मराठा या आरक्षणासाठी पेटून उठला आहे. मराठा समाजला आरक्षण दिलेच पाहिजे. उरलेल्या १० दिवसांत मराठा आरक्षण जाहीर करा. जो सरकारतर्फे शब्द दिलाय त्या शब्दवर आम्ही ठाम आहे ४० दिवस दिले होते त्यामुळे अजून १० दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही. जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुम्हाल दाखवू. आज सभेसाठी आलेला समाज शांततेत आलेल आहे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही.

ओबीसीतून आरक्षण द्यावे.

गोरगरीब मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करणयासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही. मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती आता बंद करा. मराठाच्या समाजाच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. सराकराने तातडीने आरक्षण द्यावे. राज्यातील सर्वात मोठा समाजाची हालआपेष्ठ करू नका, केंद्राने आणि राज्याने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे. मग विदर्भातील मराठा समाजाला शेती व्यवसायामुळे कुणबी जात प्रमाणपत्र दिलं. सरकारने सांगितलं होतं की गुन्हे मागे घेतले जाणार मात्र अजूनही झालं नाही.

मनोज जरांगेची छगन भुजबळांवर टीका

मनोज जरांगेनी छगन भुजबळांवर टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यामुळे आम्ही टीका करणे बंद केले. काल म्हणाले सात कोटी खर्च आला आहे. येडपट आहे का विकत नाही सभेसाठी भाड्याने घेतले आहे. 100 एकर… येवलीच्या शेतकऱ्याने आम्हाला फुकट दिले आहे. तुला दिले नाही पण मला दिला. दोन वर्षे जाऊन बेसन खाऊन आला आहे. ज्या मराठ्यांनी मोठे केले त्यांचेच पैसे ये मंत्र्याने खाल्ले आहे. मराठ्यांनी घाम गाळून सभेसाठी पैसे उभारले आहेत. अजित पवार त्याला समज द्या नाहीतर मी त्याच्या मागे लागलो तर त्याला सोडणार नाही

मनोज जरांगे यांनी सांगितला सभेचा खर्च

सभेच्या खर्चाचा हिशेब देताना जरांगे म्हणाले की , सभेची जागा शेतक-यांनी फुकट दिली आहे. सभेसाठी गाड्या देखील मराठ्यांनी आणल्या आहेत. आम्ही घाम गाळतो त्यातून हा निधी जमा केला आहे. महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता. मात्र आम्ही १२३ गावातून निधी गोळा केला आणि त्यातून २१ लाख जमा झाले आहेत.

मराठ्यांना आरक्षण द्या मराठे डोक्यावर घेऊन नाचतील

मराठ्यांनी अंगावर घेऊ नका. मराठ्यांना आरक्षण द्या मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना आरक्षण दिले तर गुलालाचे ट्रॅक्टर दिल्लीपर्यंत येतील. दरम्यान राज्यात उपमुख्यमंत्री खूप आहेत. एक म्हणतो मनोज जरांगेला अटक करा, मला अटक करणे सोप्पे आहे का असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी असेही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या

१ . मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
२ . कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी.
३ . मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी.
४ . दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या.
५ . पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.
६ . महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. एनटी ,व्हीजेएनटी प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!