Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

Spread the love

वॉशिंग्टन :  जय भीमच्या जय घोषात अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे भारतरत्न  ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी या नावाने १९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारत आणि अमेरिकन नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं यावेळी, उपस्थितांनी म्हटले आहे.  विशेष म्हणजे भरपावसात पुतळा अनावरणासाठी नागरिकांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यासाठी अमेरिकेच्या विविध भागांतून ५०० हून अधिक भारतीय व अमेरिकन नागरिक उपस्थित होते.

अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जात असल्याने आजचा क्षण १४० कोटी भारतीय आणि ४५ लाख अमेरिकन भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे दिलीप म्हस्के यांनी म्हटले आहे. तसेच, हा पुतळा या सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहे, असेही ते म्हणाले. दिलीप म्हस्के हे अमेरिकेतील आंबेडकरवादी आंदोलनाचे नेतृत्व करतात. म्हस्के हे मराठवाड्यातील असून ते जालना जिल्ह्याचे भूमिपूत्र आहेत.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर द्वारा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीची स्थापना मॅरिलँडच्या एक्कोकीक येथील १३ एकर जागेवर करण्यात आली आहे. येथील उद्यानास बी. आर.आंबेडकर स्मृति पार्क असं नावही देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भारतासह संयुक्त राज्य अमेरिकेतील मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

अमेरिकेतील हा पुतळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेर उभा करण्यात आलेला सर्वात उंच पुतळा आहे. भर पावसातही भारतीय नागरिक या कार्यक्रमासाठी उत्साहाने आले होते. काही जण १० तासांचा प्रवास करुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा बनवणाऱ्या प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच हा पुतळा बनवला असल्याची माहिती दिलीप म्हस्के यांनी दिली आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!