Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Israel-HamasWarNewsUpdate : धक्कादायक : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धा साडेचार हजाराहून अधिक मृत्यू , शवासाठी आईस्क्रीमच्या ट्रकचा वापर !!

Spread the love

तेल वीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आठ दिवस उलटून गेले  असून या युद्धात इस्रायली नागरिक, पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे.  यातील मृतांचा आकडा साडेचार हजाराहून अधिक असल्याचे वृत्त आहे.याशिवाय या संघर्षात १२  हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची चिंता वाढली असून  हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

विशेष म्हणजे हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या गोळीबारामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनींना जीव वाचवणे कठीण होत आहे. इस्रायलने रात्रभर खान युनिस, गाझा शहरासह गाझामधील अनेक भागांवर बॉम्बफेक केली. तेल अवीववर रॉकेटने हल्ला केल्याचे हमासच्या सैनिकांचे म्हणणे आहे. दरम्यान युद्ध सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे.

या युद्धात आतापर्यंत २२१५  पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जखमींची संख्या ८७१४ आहे. गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात हे सर्व जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७००  मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये मृतांची संख्या १३००  आहे, तर ३४००  लोक जखमी आहेत.

गेल्या २४ तासातील स्थिती अशी आहे …

पॅलेस्टाईनच्या वाफा न्यूज एजन्सीने गेल्या २४  तासांत गाझामधील बॉम्बहल्ल्यात ४००  हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे, तर १५००  लोक जखमी झाले आहेत. गाझा शहरात २६० , देर-एल-बालाहमध्ये ८० आणि उत्तर जबलिया शरणार्थी शिबिरात ४०  लोक मारले गेले आहेत. याशिवाय अन्य दोन ठिकाणी ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गाझा पट्टीमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची परवानगी मागितली आहे, जेणेकरून लोकांना अन्न आणि इंधन पोहोचवता येईल. गाझा पट्टीतून पॅलेस्टिनींच्या सुरू असलेल्या निर्गमनाबद्दल त्यांनी बिडेन यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. गाझा पट्टीतील लोकांवर पांढरा फॉस्फरस वापरल्याचा आरोप इस्रायलवर होत आहे. मात्र इस्रायलने या आरोपाचा इन्कार केला आहे. गाझामधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हवाई हल्ल्यानंतर पांढरा धूर दिसत होता, जो पांढरा फॉस्फरस असल्याचे सांगण्यात येत आहे.

शवासाठी आईस्क्रीमच्या ट्रकचा वापर

दरम्यान या प्रकरणात रशियाने हे युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने रशियाने हालचाली सुरु केल्या असून हमासने रशियाच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भूमिकेचे आम्ही कौतुक करतो, असे हमासने म्हटले आहे. गाझामधील इस्रायलच्या कारवाईबाबत दिलेले वक्तव्यही स्वागतार्ह आहे. रशियाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. धादायक बाब म्हणजे  गाझा रुग्णालयातील शवगृहे मृतदेहांनी भरलेली आहेत. त्यामुळे आता मृतदेह कुजू नयेत म्हणून आईस्क्रीमच्या ट्रकचा वापर केला जात आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, स्थानिक कंपन्यांकडून आईस्क्रीमचे ट्रक खरेदी करण्यात आले असून त्यामध्ये मृतदेह ठेवले जात आहेत.

बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा सीमेला भेट

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा सीमेला भेट दिली. त्यांनी आघाडीवर असलेल्या सैनिकांशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिले. नेतन्याहू म्हणाले की, आमचे सैन्य गाझा पट्टीत आहे, त्यामुळे आम्ही तयार आहोत. हमासचा नायनाट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की ते आता हमाससोबतच्या युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत आहेत. गाझामध्ये घुसून हमासच्या ठाण्यांवर जमिनीवर हल्ला केल्यानंतर आता हवाई, समुद्र आणि जमिनीद्वारे हल्ले करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी हजारो राखीव सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे.

युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि गाझाला मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध संपवणे आणि गाझाला वैद्यकीय मदत देण्यावरही चर्चा झाली. अमेरिकेने आपली दुसरी विमानवाहू नौका भूमध्य समुद्रात पाठवल्याचे म्हटले आहे. अमेरिकन विमानवाहू युद्धनौका गाझामध्ये हमासविरुद्ध लढणार नाही किंवा इस्त्रायली कारवायांमध्ये भाग घेणार नाही. इराण आणि हिजबुल्लाला नियंत्रित करण्यासाठी ते पाठवण्यात आले आहे. दरम्यान अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला असून त्यामुळे विमानतळ सेवा विस्कळीत झाल्याचे सीरियाने म्हटले आहे. सीरियाने या हल्ल्यावर टीका करत इस्रायलला आपल्या कारवाया थांबवण्यास सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!