Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Israel Palestine War Updates : इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये भयंकर युद्ध, अमेरिकेचा इस्रायलला पाठींबा …

Spread the love

तेलअवीव : इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. हे युद्ध हमासच्या दहशतवाद्यांनी सुरू केले होते, त्यानंतर इस्रायलने जोरदार पलटवार केला. इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले असून  या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेने हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा आणि लष्करी मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलजवळ अमेरिकन जहाजे आणि युद्ध विमाने तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

या संघर्षातील मृतांचा आकडा 1000 पार पोहोचला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. शनिवारी हमासने इस्रायलच्या विविध शहरांमध्ये 5000 हून अधिक क्षेपणास्रांचा मारा केला. यानंतर अवघ्या दोन दिवसांत या संघर्षाचा भडका उडाला असून यामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले की, ते विमानवाहू युद्धनौका USS गेराल्ड आर. फोर्ड आणि सोबतच्या युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात पाठवत आहे जेणेकरुन या प्रदेशातील लढाऊ जेट स्क्वॉड्रनला चालना मिळेल. यूएस सेंट्रल कमांडने रविवारी सांगितले की जहाजे आणि विमाने नवीन पोस्टवर जाऊ लागली आहेत.

दहशतवादी हल्ल्यात 700 नागरिक ठार

वास्तविक, हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर अचानक हजारो रॉकेट डागले. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी हवाई, जमीन आणि सागरी सीमेवरून घुसून नागरिकांवर हल्ले केले होते. हमासच्या या हल्ल्यांमध्ये सुमारे 700 नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यात चार अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला. व्हाईट हाऊसने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन नागरिक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा देत अनेक मोठी पावले उचलली आहेत. तसेच इतर देशांना या संघर्षापासून दूर राहण्याचा इशारा दिला.

अमेरिकेची तयारी

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार , बिडेन यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आणि इस्त्रायली संरक्षण दलांना अतिरिक्त मदत पुरवली जात असल्याची माहिती दिली. आणि आगामी काळात आणखी मदत केली जाईल. बिडेन यांनी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे सरकार आणि जनतेला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

या आदेशानंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानेही महत्त्वपूर्ण पावले उचलली असून यूएस वायुसेनेने ‘CLEAN01’ या कॉल साइनसह KC-10A एक्स्टेंडर विमान तैनात केले आहे. समुद्र किनार्‍याजवळून ते पॅलेस्टाईन आणि इस्रायलवर लक्ष ठेवून आहे.

या बाबत बोलताना , अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की , इस्रायल आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांसाठी हे आव्हान आहे. या दहशतवादी हल्ल्याला  आमचा विरोध आहे. आम्हाला पुन्हा अशी पावले उचलावी लागतील की , कोणतेही दहशतवादी  पुन्हा अशी पावले उचलणार नाहीत. यास काही वेळ लागू शकतो. इस्रायलसाठी अत्यंत कठीण आणि कठोर निर्णय घेण्याची ही वेळ आहे.

इस्रायलचा जबरदस्त पलटवार

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार पलटवार केला. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर समोर आलेल्या चित्रांमध्ये शहरे ढिगाऱ्याखाली गेल्याचे दिसून येते. इस्रायल आणि हमास यांच्यात जमिनीपासून आकाशापर्यंत युद्ध सुरू आहे.

इराण, लेबनॉन, पाकिस्तानसह अनेक देशांचा हमासला पाठींबा

वरवर पाहता, हे युद्ध इस्रायल आणि हमास यांच्यात होत असले तरी ते अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. खरे तर इराण, लेबनॉन, पाकिस्तानसह अनेक देश उघडपणे हमासच्या समर्थनात उतरले आहेत. लेबनॉनच्या इराण समर्थित हिजबुल्लाह चळवळीने दावा केला आहे की त्यांनी इस्रायली स्थानांवर शेल आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणने हमासचे अभिनंदन केले असून पॅलेस्टिनी सैनिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. पॅलेस्टिनी लोकांविरुद्धच्या वाढत्या हिंसाचाराला केवळ इस्रायल जबाबदार असल्याचे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी सौदी अरेबियाने पॅलेस्टाईन आणि इस्रायलला तात्काळ प्रभावाने तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.

भारताकडून हमासचा निषेध आणि इस्रायलला पाठींबा

दुसरीकडे अनेक जागतिक महासत्ताही इस्रायलच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आल्या आहेत. जिथे अमेरिकेने आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पीएम मोदी म्हणाले की, या कठीण काळात आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्रायलवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर केलेल्या हल्ल्याने मला धक्का बसला आहे. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. मी पीडित, त्यांचे कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!