Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationNewsUpdate : मराठा आक्षण कोण देऊ शकते ? श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितला मार्ग…

Spread the love

कोल्हापूर: घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हा विषय सुटणार नाही, मराठा आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकते यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसेच मोदी यांना राज्य सरकारने विषय समजावून सांगितला पाहिजे. असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले की , केंद्रात सध्या त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे ते घटनादुरुस्ती करून घेऊ शकतात. जर ५०% ची मर्यादा वाढवल्यास ओबीसीतून आरक्षण वैगरे हे वाद राहणार नाहीत. सध्या तरी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे पुढे एक वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर काय होईल हे सांगता येणार नाही

मनोज जरंगे पाटील यांचा जीव वाचवणे सरकारला अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी तो वाचवण्यासाठी सरकारन प्रयत्न करणे महत्वाचे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने यापूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे होते. सरकारने लक्ष दिले नसल्याने आंदोलकांवर लाठीमार झाला आणि त्यामुळेच विषय चिघळला आहे, असे ही शाहू महाराजांनी यावेळी म्हटले आहे.

उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही

शिवाय कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून ही जर गणपती पूर्वी मार्ग निघाला नाही तर २ ऑक्टोबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला असून याबाबत ही शाहू महाराज भाष्य केले असून पाठिंबा वगरे ठीक आहे, मात्र अशा पध्दतीने उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी कायदा बदलून हे करू शकतात, असे शाहू महाराज छत्रपती म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!