Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह , परीक्षार्थ्यांचे भवितव्य टांगणीला …

Spread the love

औरंगाबाद : राज्यातील नोकरभरतीच्या स्पर्धा परीक्षा घेण्याची जाबाबदारी खासगी संस्थेला देण्यात आल्यानंतर परीक्षार्थ्यांना प्रचंड मांसत्पाल सामोरे जावे लागतात आहे . दरम्यान तलाठी, वनरक्षक, म्हाडा व पोलिस भरती या शासनाच्या परीक्षांत ब्लूूटूथच्या माध्यमातून हायटेक कॉपी रॅकेट्सने धुडगूस घातल्याचे उघडकीस आल्याने या सर्व परीक्षांवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. ही संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून करण्यात येत असलेली म्हाडा, पोलिस भरती, तलाठी भरती, पिंपरी-चिंचवड महापालिका नोकर भरती आणि वनरक्षक भरती या शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने हाहाकार मजला आहे. या प्रकरणात राज्यातील १३ पोलिस ठाण्यांत २२८ आरोपींविरोधात १४ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ११३ आरोपी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील व त्यातही ४१ आरोपी वैजापूर तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे त्यातील १६ आरोपी संजनपूरवाडी या एकाच गावातील असून त्यांचा एकापेक्षा अधिक गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे.

दरम्यान चार जूनला येथे तपासासाठी आलेल्या दहिसर पोलिस स्टेशनच्या पथकावर गावकऱ्यांनी कोयते, कुऱ्हाडी घेऊन हल्ला केला. ते पोलिस आले होते जनकसिंग सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन फरार आरोपींना अटक करण्यासाठी. ११ मे रोजी दहिसर पोलिस स्टेशनमध्ये म्हाडा परीक्षेतील गैरव्यवहाराबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, तेव्हापासून फरार असलेले जनकसिंग आणि संतोष गुसिंगे त्या दिवशीच्या कोलाहलातही पुन्हा पळून गेले. या गावातील तब्बल १७ आरोपींविरोधात राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. सर्वांतील आरोप एकच आहे, शासकीय परीक्षांमधील पेपरफुटी.

जामिनावर सुटला, १९ दिवसांनंतर पुन्हा अटक झाला …

अवघ्या १९ दिवसांपूर्वी ३ ऑगस्टला कोल्हापूरला वनरक्षक परीक्षेत हाच गणेश नागलोत अशीच कॉपी करताना अटक झाला होता. एका ठिकाणी कॉपीचा गुन्हा दाखल केल्यानंतरही तो शांत बसला नाही. संभाजीनगरातील खोडेगाव येथे राहणाऱ्या गणेश नागलोत या परीक्षार्थीला २२ ऑगस्ट २०२३ रोजी तलाठी परीक्षेच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक साहित्यासह अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात तलाठी भरतीतील कॉपीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!