Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खबरदार ढाब्यावर दारू प्याल तर … होऊ शकते तुमच्याविरुद्ध कारवाई …

Spread the love

मुंबई : राज्यात परवाना नसताना उघड्यावर आणि धाब्यावर बसून जे दारू पितात किंवा बेकायदा आणि बनावट मद्यविक्री करतात अशा दारूड्यांसह हॉटेल, ढाबा आणि चायनीज सेंटर चालकांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत मद्यविक्रीस आणि मद्यप्राशनास परवानगी नसलेले हॉटेल, ढाबे आणि चायनीज सेंटरमध्ये दारू प्याल तर; कोर्टाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

परमिट रूमची परवानगी नसणाऱ्या हॉटेल आणि ढाब्यावर केवळ जेवण करता येते. त्यामुळे अशा हॉटेल किंवा ढाब्यावर मद्यपान करणे गुन्हा ठरतो. यात गुन्हा दाखल करून ढाबाचालकांना लाखोंचा दंड आकारण्यात येतो. गुन्हा दाखल केल्यावर कोर्टात जावे लागते. ढाबाचालकांना दारू विक्री करण्याची परवानगी नसते. ढाब्यावर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई केली जाते. दारू विक्री करणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करणे यासाठी स्वतंत्र परवाने असतात. त्या परवान्याच्या आधीन राहूनच दारूची विक्री करता येते. मात्र बाहेरून दारू आणून ढाब्यांवर पिण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ढाबाचालकही ग्राहकांना दारू उपलब्ध करून देतात.

अशा हॉटेल आणि ढाब्यांची नियमित तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होते. या कारवाईत कुणीही सापडल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई होते. आतापर्यंत औरंगाबाद , पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, मुंबई -बंगळुरू महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग या मुख्य मार्गांवर अवजड वाहनचालक ढाब्यांवर मद्यपान करतात. या ठिकाणी जवळपास दीडशे ते दोनशे जणांवर कारवाई झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!