Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra ST News Update : आंदोलन जरूर करा पण सर्व सामान्यांच्या एसटीला वाचवा, २० बसेस झाल्या खाक तर १९ बसेसची तोडफोड …

Spread the love

मुंबई : मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनात ज्या बसेस जाळण्यात आल्या तर, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला असून हा एकदा तब्बल १९ कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याची मोठी झळ बसली , हे लक्षात घेता आंदोलकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन जरूर करावे परंतु सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या एसटीवर आपला राग काढता काम नये असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

मुळात कोणतेही आंदोलन झाले की , आंदोलकांचा पहिला दगड एसटीवर भिरकावला जातो . गेल्या दोन दिवसातील आंदोलनामुळे तर आधीच आर्थिक संकटात असणाऱ्या एसटी महामंडळाला आंदोलनाच्या हिंसक प्रतिक्रियेचा फटक बसला आहे. जालन्यातील लाठीमाराची बातमी वेगाने पसरू लागल्यानंतर जालना आणि परिसरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने आपली वाहतूक बंद ठेवली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केल्याने महामंडळाला फटका बसला.

२० बसेस झाल्या खाक तर १९ बसेसची तोडफोड

मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या २५०आगारांपैकी ४६ आगारातील वाहतूक पूर्णतः बंद आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला आहे याच जिल्ह्यातील बहुतांशी एसटी आगार बंद आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटी बसेसना आग लावण्याची घटना घडली. यामध्ये एसटीच्या २० बसेस पूर्णत: जळालेल्या आहेत. तर, १९ एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखाचे नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसात बंद असलेल्या आगारामुळे आणि इतर आगारातील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे ८ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. सोमवारी, संध्याकाळ ४ वाजेपर्यंत एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे ६२०० फेऱ्या जिल्हा बंद आंदोलनामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सुमारे दोन कोटी ६० लाख रुपये महसूल बुडाला आहे.

३ हजार १८१ जणांवर गुन्हे दाखल

जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद उमटले आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात ३ हजार १८१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३३ आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम ३५३, ३३२, ३३६, ३३७, ३४१, ४३५, १४४, १४३, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १०९, ११४ भादंविसह कलम १३५ मु. पो. कायदा, सहकलम -३ व ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम ७ क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!