Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : टेम्पोवर टँकर आदळून झालेल्या अपघातात ९ जण ठार …

Spread the love

प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये सोमवारी एक भीषण अपघात झाला. रायबरेलीहून वाराणसीला जाणाऱ्या एलपीजी टँकरने प्रवाशांनी भरलेला टेम्पोला धडक दिल्यामुळे अपघातग्रस्त टेम्पो रस्त्यावर उलटला. त्यामुळे ऑटोमधील महिला आणि लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. तर सात जखमींना गंभीर अवस्थेत प्रयागराज येथे उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जेठवाडा येथील भैरोपूर येथील रहिवासी सतीश गौतम (२६) हे सोमवारी दुपारी 3 वाजता टेम्पोमध्ये पंधरा प्रवासी भरून मोहनगंजच्या दिशेने जात होते. वाराणसी-लखनौ महामार्गावर मोहनगंज मार्केटच्या आधी लिलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील विक्रमपूर वळणावर लालगंजकडून येणारे एलपीजी टँकर टेम्पोवर अचानक आदळले आणि हा अपघात झाला. त्यानंतर टँकर महामार्गावर पलटी झाला.

मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांसह पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सर्वांना टेम्पोमधून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. इतरांना प्रयागराज येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले.

मुखमंत्र्यांकडून सांत्वन आणि मदत जाहीर

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रकाशचंद्र श्रीवास्तव आणि एएसपी रोहित मिश्रा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना जखमींवर शक्य ते सर्व उपचार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान प्रतापगडच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले करून जखमींना ५० हजार रुपये आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!