Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सर्वोच्च न्यायालयात..

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि   प्रियंका गांधी वाड्रा यांनी आयकर विभागाशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी त्यांचे २०१८ -१९  चे आयकर मूल्यांकन आयकराच्या केंद्रीय मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या आदेशास आव्हान दिले आहे. २०१८ -१९  चे आयकर मूल्यमापन शस्त्र विक्रेता संजय भंडारी यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय भंडारी हा मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली भारतात हवा आहे. तो प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रॉबर्ट वाड्रा यांनी आरोपींशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला आहे.

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची याचिका फेटाळली होती. आयकर विभागाने नियमानुसार निर्णय घेतल्याचे हायकोर्टाने म्हटले होते. त्यांचा संजय भंडारी गटाच्या कारभाराशी काहीही संबंध नसल्याचे कारण देत त्यांची प्रकरणे सेंट्रल सर्कलकडे हस्तांतरित करण्यास गांधी परिवाराने विरोध केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!