Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPolicalUpdate : अभ्यास झाला !! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर इन ऍक्शन मोड, शिंदे – ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा

Spread the love

 बाजू मांडण्यासाठी ७ दिवसांचा वेळ , मुख्यमंत्री जाणारच्या अफवांनी राजकीय बाजार गरम !!

मुंबई ” महाराष्ट्रात राजकीय उलथापाला सुरू असताना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या आमदारांनाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे. त्यानुसार सर्व आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. राहुल नार्वेकर लवकरच या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली होती. त्यावर ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरणपत्र देखील देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांना 90 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांना हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे.

बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत

दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाचे आमदारांना बोलावून देखील विधानसभा अध्यक्ष चर्चा करणार असल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर लगेचच राहुल नार्वेकर या संदर्भातला निर्णय घेतील.

अफवांकचा बाजार झाला गरम …

शुक्रवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. यात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य आठ आमदारांच्या नियुक्तीमुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे गटातील नाराज आमदारांचे मन वळविण्यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक झाल्यांने आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुख्यामंत्री जाणार ?

मी ऐकले आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात, असे वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. एकवर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी केली. स्वत:ची इज्जत काय आहे ते दाखवली. त्यांना आज भाजपने त्यांची खऱी किंमत काय दिलीय ते दाखवलं आहे. जे ओरिजनल गद्दार आहेत. त्यांच्याबद्दल मला हसू येतंय. आम्ही आता कॅबिनेट मंत्री बनू, राज्य मंत्री बनू या एका आशेने ते तिथे गेले. चार दिवस झाले शपथविधी होऊन पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. ज्यांनी त्यांना फोडले त्यांनीच त्यांची खरी किंमत दाखून दिली आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

शिंदेंचे मुख्यमंत्री राहतील ​​​

दरम्यान येत्या काही दिवसांत राज्याला नवा मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता धुडकावून लावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, विरोधी पक्ष जाणीवपूर्वक गोंधळ घालत असून पुढील निवडणुकांपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!