Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : भाजपासोबत चर्चा झाली पण विचारसरणी वेगळी असल्याने निर्णय नाही : शरद पवार

Spread the love

मी अजून म्हातारा झालेलो नाही.ना टायर्ड ना ना रिटायर्ड…

नाशिक : पक्षाचे राष्ट्रे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा केला अजित पवार यांनी केला होता. हा दावा मान्य करताना २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत चर्चा झाली होती. मात्र विचारसरणी वेगळी असल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सांगितले की, आम्ही २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपासोबत चर्चा केली होती. मात्र आपली विचारसरणी वेगळी असल्याने आपण असे करता कामा नये, असे मी ठरवले प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही गोष्ट समजण्याचे गांभीर्य नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की,  मी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा ते ८४ वर्षांचे होते…

नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीत्यांना पत्रकारांनी अजित पवारांच्या भाषणावरुन प्रश्न विचारला. तसंच भुजबळांना आम्हीच येवलाची जागा लढवायला देऊन सेफ केलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कुटुंबात जे काही झालं त्याची चर्चा मी बाहेर करणार नाही…

दरम्यान, राज्यात सध्या स्थिर सरकार तर आहे. मात्र हे सरकार दिल्लीतीली भाजपाकडून चालवलं जाणार आहे. तसेच येथे इतर लोकांना केवळ मंत्रिपद मिळेल, या आशेपोटी लोक तिकड़े जात आहेत , असा चिमटाही शरद पवारांनी काढला. ते पुढे म्हणाले की, कुटुंबात जे काही झालं त्याची चर्चा मी बाहेर करणार नाही. मला नक्कीच वाईट वाटलं. हे सारे जण माझे जवळचे होते. मात्र मी आधीही अशा घटनांचा सामना केला आहे. मी पक्षाला पुन्हा उभं करेन. निवडणूक आयोगामध्ये काय होईल. त्याने फरक पडत नाही. मी जमीनीवर काम करेन, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

म्हणून मी नाशिक निवडलं ..

मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

भजबळांना मी सेफ जागा दिली …

मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव मी पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केलं होतं. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता असंही आज शरद पवार यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!