#MahaClassified – तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज उद्या पासून होणार सुरु

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या तलाठी भरती जाहिरात २३ जूनला शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
पदाचे नाव –तलाठी
पद संख्या – ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर 250 Posts नागपूर 177 Posts
अकोला 41 Posts नांदेड 119 Posts
अमरावती 56 Posts नंदुरबार 54 Posts
औरंगाबाद 161 Posts नाशिक 268 Posts
बीड 187 Posts उस्मानाबाद 110 Posts
भंडारा 67 Posts परभणी 105 Posts
बुलढाणा 49 Posts पुणे 383 Posts
चंद्रपूर 167 Posts रायगड 241 Posts
धुळे 205 Posts रत्नागिरी 185 Posts
गडचिरोली 158 Posts सांगली 98 Posts
गोंदिया 60 Posts सातारा 153 Posts
हिंगोली 76 Posts सिंधुदुर्ग 143 Posts
जालना 118 Posts सोलापूर 197 Posts
जळगाव 208 Posts ठाणे 65 Posts
कोल्हापूर 56 Posts वर्धा 78 Posts
लातूर 63 Posts वाशिम 19 Posts
मुंबई उपनगर 43 Posts यवतमाळ 123 Posts
मुंबई शहर 19 Posts पालघर 142 Posts
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
तलाठी
- (महसूल विभाग) जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
- पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
- आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
- PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/1bdMCMUGjSx4bGrabZP7gvhsulzrL-yih/view
- ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज (ऑनलाईन अर्जाची लिंक २६ जून २०२३ पासून सुरु होणार)
- अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/
- पेसा क्षेत्रातील यादी https://drive.google.com/file/d/1SMkkjGLgULXC2CmORpYD9_-2IYlVCybx/view
अशा पद्धतीने करा अप्लाय
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
- अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
- अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
- सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055