Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

Live Mahanayak news-updates | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


Sunday | 25.June.2023


 

  • मान्सूनने महाराष्ट्राला व्यापले आहे. आज जिल्ह्यात मान्सूनच्या पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने जिल्हातील गडचांदुर शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी दिसू लागले होते. सखल भागातील घरात पाणी शिरले आहे.अद्यापही पाऊस सुरूच आहे.

 

  • दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात

 

  • पुणे – सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार व दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली असून सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

 

 

 

 

 

  • मुंबईतील विलेपार्ले परिसरातील नानावती हॉस्पिटलला लागून असलेली इमारत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. इमारतीत अडकलेल्या ५ जणांची सुटका करण्यात आली आहे, ज्यांना उपचारांसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इमारतीत अडकलेल्या ५ जणांपैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

  • पुढील ३-४ तासांत ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन आयएमडी मुंबईकडून करण्यात आले आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा.

 

  • आषाढी वारीचा घेणार आढावा, नांदेड दौरा आटपून मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना होणार असल्याची माहिती.

 

  • भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाणी तुंबलेल्या भागाची पाहणी केली, या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 

  • काही दिवसांपूर्वीच जुहू बीच इथं ५ मुले बुडाली होती. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली होती, आज सकाळी २ मुले बुडत असताना त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

  • शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या आता कोकणासाठी बंद, रत्नागिरी रायगड ठाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठा निर्णय; नव्या शिक्षक भरतीत दिव्यांग व महिलांना प्राधान्य

 

  • पहिल्याच पावसात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात छोटे दगड कोसळले, परशुराम घाटातील एक लेन सुरळीत सुरू

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!