Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MansoonNewsUpdate : मुंबईत मुसळधार , काळ्या ढगांच्या गर्दीने महाराष्ट्राला व्यापले …

Spread the love

मुंबई: कालपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आता मुंबई, पुणेपर्यंत मर्यादीत असलेला पाऊस संपूर्ण राज्यात दाखल झाला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी दिली.

गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सगळ्यात जास्त पाऊस ५.३० ते ७.३० या वेळेत पडला आहे. या काळात ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर पुढील ५ दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळपर्यंत मुंबई, नवी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत मोसमी वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरु असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून त्यामुळे दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1672886381407002625?

दरम्यान हवामान खात्याने राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर छत्रपती साभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात काळ्या ढगांनी आकाशात मोठी गर्दी केली असली तरी भूर भूर पावसाशिवाय अद्याप कुठलाही चांगला पाऊस पडला नाही. मात्र वातावरणात बद्दल झालेला असला तरी जोरदार वाऱ्यामुळे आकाशात दाटून आलेले ढग पुढे जात असल्याने हवेतही प्रचंड उकाडा निर्माण झाल्याने लोक त्रस्त आहेत.

मान्सूनमुळे आता राज्यभर पाऊस

यंदा मान्सून लांबतच चालल्याने राज्यातील अनेक जलप्रकल्पांतील उपयुक्त साठा कमी झाला होता. राज्यातील मोठे अन् मध्यम प्रकल्पांतील साठाही कमी होत होता. यामुळे शहरी भागातही चिंता निर्माण झाली होती. परंतु आता आनंदाची बातमी आली आहे. राज्यात मान्सूनने सक्रीय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. तसेच गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला आहे.

आगामी अंदाज काय ?

मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पुढचे 5 दिवस सक्रिय राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कुठे कुठे पाऊस असणार आहे, त्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यानुसार कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे.

रविवारी अनेक ठिकाणी पाऊस

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रविवारी पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. रविवारी कोकण, विदर्भातील काही भाग अन् मुंबई, पुणे भागात पाऊस पडत आहे. पुण्यात रविवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर आणि आज सकाळपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा शहर अन् परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आता आज अन् सोमवारीही पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!