Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : “आम्ही कुणाच्या घरात घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही…. ” देवेंद्र फडणविस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार !!

Spread the love

मुंबई : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे की , “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर…
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)

तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…”

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!