Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMNewsUpdate : मुस्लिम समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा बराक ओबामांसह पत्रकारांनीही केला उपस्थित , मोदी म्हणाले भारतात कोणतेही भेद नाहीत..!!

Spread the love

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र भारतात मुस्लिम समुदायाची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. भारत हा हिंदू बहुसंख्यांचा देश आहे. मात्र तिथल्या मुस्लिम अल्पसंख्यांकांची सुरक्षा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. जर माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली असती तर मी त्यांच्याशी हा विषय बोललो असतो. जर अल्पसंख्याकांची सुरक्षा हा मुद्दा पाहिला गेला नाही तर भविष्यात भारतात दोन समुदांमधली फूट वाढू शकते. हे भारताच्या राष्ट्रहिताच्या विरोधात असेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भारतातील मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे असे मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन या दोघांनाही पत्रकार परिषदेच्या दरम्यान या मुद्यावारून प्रश्न विचारण्यात आला. तेंव्हा मोदी यांनी आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याकडे जात , धर्म , रंग, वंश , लिंग यावरून कोणतेही भेद मानले जात नाहीत. सब का साथ, सब का विकास, सब का प्रयास हे आमचे ध्येय आहे. असे उत्तर दिले.

भारतातील मुस्लिम सुरक्षेचा मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि त्यानंतर अमेरिकेच्या संसदेत भाषणही केले. तसेच जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही महत्त्वाची मानली जाते आहे. अशात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी जो बायडेन यांना दिलेला सल्ला लक्षवेधी ठरतो आहे. बराक ओबामा यांनी सीएनएनला एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी भारतातील मुस्लिम सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणे ही सोपी बाब नाही. मी जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो तेव्हा मी लोकांना भेटत होतो. मी लोकांशी चर्चा करत होतो. त्यांना मी विचारत असे की आपले सरकार, आपला पक्ष हा लोकशाही पाळतो आहे हे तुम्हाला वाटते का? अनेकदा या प्रश्नाचे उत्तर लोक नाही असेही द्यायचे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला या आणि अशा अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात. यामध्ये वित्तीय मुद्देही समाविष्ट आहेत. पॅरीसच्या करारासाठी मी मोदी आणि चीन दोहोंशी चर्चा केली होती.

हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद होणं, दोन्ही समुदायांमध्ये भांडणं होऊ लागली, त्यांच्यातली फूट वाढली तर ते फक्त मुस्लिम हितांच्या आणि हिंदू हितांच्याही विरोधात आहे.भारतामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या संरक्षणाच्या मुद्दय़ावर चर्चा व्हायला हवी, असे मत बायडेन यांचे स्वपक्षीय नेते आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. मोदी यांच्याशी चर्चा करताना हा मुद्दाही घ्यावा, असा सल्ला मोदी-बायडेन भेटीपूर्वी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबामा यांनी दिला. मोदी यांच्याशी भेट झाली असती तर अल्पसंख्याकांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला असता, असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!