Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


Thursday | 22.June.2023


दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

  • भाजपविरोधी रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची २३ जून रोजी पाटनामध्ये बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाटणामध्ये सध्या बैठकीची तयारी सुरु आहे. या बैठकीत हे नेते होणार सहभागी;

– काँग्रेसचे नेते राहुल गांधी

– काँग्रेस अध्यक्ष – मल्लिकार्जून खर्गे

– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

– आपचे प्रमुख – अरविंद केजरीवाल

– डीएमकेचे प्रमुख – एमके स्टॅलिन

– झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख – हेमंत सोरेन

– समाजवादी पक्षाचे प्रमुख – अखिलेश यादव

– शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख – उद्धव ठाकरे

– पीडीपी प्रमुख – महबूब मुफ्ती

– नॅशनल कॉन्फरन्स प्रमुख – उमर अब्दुल्ला

– भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस – डी राजा

– मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस – सीताराम येचुरी

– भारत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस – दीपांकर भट्टाचार्य

 

  • जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. तर जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे. जिल्हाअंतर्गत आपसी बदली सुद्धा वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत आदी अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे

 

 

  • देशातील काही भागात पावसाची हजेरी, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा २५ जूनपासून देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आल्याचं चित्र आहे.

 

  • तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा

 

 

 

 

 

 

 

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!