चलनातून बाद झालेल्या दोन हजारांच्या गुलाबी नोटा साईंच्या दानपेटीत
शिर्डी : दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर काही लोकांनी या नोटा बादलण्यासाठी बँकेत रंग लावल्या आहेत तर अनेक साई भक्तांनी शिर्डीतील साई मंदिराच्या चरणी दानपेटीत या दोन हजारांच्या नोटांचे दान केल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात न दिसणाऱ्या दोन हजारांच्या नोटा साईंच्या दानपेटीत पडत आहेत. अवघ्या महिन्याभरात तब्बल अडीच कोटी रुपयांच्या १२ हजार नोटा साई मंदिराच्या दानपेटीत भक्तांकडून दान करण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून दोन हजारांची नोट ना चलनात दिसत होती ना एटीएममध्ये. मात्र मे महिन्यात रिझर्व्ह बँकेनं मोठा निर्णय घेत ३० सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर साईंच्या चरणी भक्तांकडून दान करण्यात आलेल्या दानात तुरळक आढळणाऱ्या दोन हजारांच्या नोटांच दिसत आहे.
गेल्या महिनाभरात दानपेटीतील दानात दोन हजारांच्या नोटांची मोठी वाढ झाली आहे. एकूण मिळलेल्या दानात दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात अडीच कोटींचं दान साईबाबा संस्थानला प्राप्त झालं आहे. मागील एका महिन्यात साई संस्थानाला दान स्वरूपात दोन हजारांच्या एकूण १२ हजार नोटा प्राप्त झाल्या आहेत. दक्षिणापेटीत चार हजार तर देणगी काऊंटरवर आठ हजार नोटांचे दान प्राप्त झाले आहे. याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी माहिती दिली
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055