Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दर्शना पवार हत्या प्रकरणात राहुल हंडोरे अखेर गजाआड 

Spread the love

पुणे : दर्शना पवार हिची हत्या झाल्यानंतर अखेर पाच दिवसाने तिचा मारेकरी पोलिसांना सापडला आहे. त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी दर्शनाच्या कुटुंबीयांनी केली आहे. एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता दर्शनाचा मित्र राहूल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड करण्यात आले आहे. दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने राहुलने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल फरार होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिचा मित्र राहुल हंडोरेला आता अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

म्हणून राहुल हंडोरे अस्वस्थ होता

दर्शना आणि राहूल एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन आधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केल्याचा संशय आहे.

राहुल हंडोरेला अटक झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला आधी आमच्या ताब्यात द्या. नाही तर त्याला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शना पवारच्या भावाने दिली आहे. दर्शनाच्या हत्येने तिचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहे. दर्शनाच्या आईनेही मुलीच्या निधनाने आकांत केला आहे. माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय. तशा इतरांच्या मुली ‌जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.

सकल मराठा समाजाचे आंदोलन

दरम्यान, दर्शनाची हत्या झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज कोपरगावात मोर्चाचे आयोजन केले आहे. आंदोलकांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. दर्शनाची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणा दिल्या. या ठिय्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि बेपत्ता झाली; राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत सापडला मृतदेह

#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!