सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि बेपत्ता झाली; राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत सापडला मृतदेह

अहमदनगरच्या दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत सापडला आहे. यानंतर आता तिच्या शवविच्छेदन अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. यातून सुरुवातीला संशयास्पद वाटणारा हा मृत्यू आता हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याने तपासाची चक्र फिरवली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची दर्शना पवार आठ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलीस तक्रारही दिली होती. यानंतर आता पोलिसांना तिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वीच दर्शनाला एमपीएससी परीक्षेत यश मिळाले होते आणि तिची वन खात्यात अधिकारी म्हणून निवड झाली होती. निकालानंतर ती एका सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि त्यानंतर बेपत्ता झाली.
पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालात दर्शना पवारची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा झालेल्या आढळल्या आहेत. यानुसार वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली असून विविध पोलीस पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
दर्शना पवार सत्कार कार्यक्रमानंतर राहुल हंडोरे नावाच्या मित्राबरोबर ट्रेकिंगला गेल्याचे समोर आले आहे. तपासात दर्शना आणि तिचा मित्र राहुल ट्रेकिंगला जाताना सीसीटीव्हीत दिसले आहेत. मात्र, परत येताना राहुल एकटाच दिसला. त्यामुळे त्याच्यावर संशयाची सुई गेली आहे. मात्र, राहुल हंडोरेही बेपत्ता असल्याची त्याच्या कुटुंबानेही पोलीस तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली असून अधिक तपास सुरु आहे.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055