Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एकादशी – बकरी ईद एकाच दिवशी असल्याने ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love

यंदा एकाच दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

२९ जूनला आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरम्यान याच दिवशी बकरी ईद देखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत असा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचे देखील या बैठकीत निर्णय झाला आहे.

वाळूज भागात असलेल्या पंढरपूर गावात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून, आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे पासूनच जिल्ह्याभरातून भाविक पंढरपूर गावात दाखल होत असून शेकडो दिंड्या देखील येतात. त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असतो. मात्र याच दिवशी बकरी ईद देखील असल्याने कुर्बानी न करण्याचा निर्णय स्थानिक मुस्लीम समाजातील नागरिकांनी घेतला आहे. या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत असून कौतुक देखील होत आहे.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसीला द्यावे , छगन भुजबळ यांची मन की बात

#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!