Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMNewsUpdate : विविधतेत एकता , वुई द पीपल, लोकशाही , संविधान यावर काय बोलले मोदी ? लेखक , बुद्धिवाद्यांचा मात्र भाषणावर बहिष्कार !!

Spread the love

वॉशिंग्टन : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक गटांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने राबविलेल्या उपाययोजनांबाबत अमेरिकन माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की लोकशाही भारतीय समाजात खोलवर रुजलेली आहे. “लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे आणि आपण ती जगतो. आमच्या संविधानात या गोष्टी आहेत.जात-धर्म लिंग , वंश , रंग किंवा प्रांताच्या आधारावर भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही. भारताचा सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास यावर विश्वास आहे.

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ही मोदींची ऑफिशियल स्टेट व्हिजिट आहे. आज मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे स्वागत करताना बायडन यांनी म्हटले , “दोन्ही देशांच्या राज्यघटनेत सुरूवातीलाच तीन शब्द आहेत- वुई द पीपल. यातूनच आमचे देश म्हणून प्राधान्यक्रम काय आहेत, हे स्पष्ट होते .” त्यांनी पुढे म्हटले की, दोन्ही देशांच्या नात्यामध्ये परस्परांत विश्वास आहे. त्यातून आमचे नाते दृढ होत आहे.”

२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी क्वचितच पत्रकार परिषदा घेतल्यामुळे मोदींनी प्रश्न घेऊन मीडियाशी संवाद साधणे हा त्यांच्या नेहमीच्या सरावातून बाहेर पडलेला आहे. मे २०१९ मध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित असताना, त्यांनी कोणतेही प्रश्न स्वीकारण्याचे टाळले होते मात्र यावेळी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेचा निर्णय व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व मान्य केले.

प्रेस कॉन्फरन्स फॉरमॅटमध्ये एक प्रश्न यूएस प्रेसकडून आणि दुसरा भारतीय पत्रकाराकडून विचारला जाऊ शकतो, जसे की किर्बी यांनी म्हटले होते. जागतिक नेत्यांचा समावेश असलेल्या व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदांना कठोर नियंत्रणाचे वैशिष्ट्य आहे, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अध्यक्ष बायडेन आणि मोदींना संबोधित करण्यासाठी अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील पत्रकारांची पूर्व-निवड केली. या परिषदांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या अर्थातच मर्यादित होती.

सहकारी डेमोक्रॅट्सच्या वाढत्या दबावादरम्यान, अध्यक्ष बायडेन यांना पंतप्रधान मोदींसोबत मानवाधिकारांच्या कथित समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्नांचा सामना करावा लागला. ७५ यूएस सिनेटर्स आणि कॉंग्रेसच्या खासदारांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात, चिंतेची विशिष्ट क्षेत्रे रेखांकित करण्यात आली होती. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासोबत एका खाजगी डिनरनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली.

लेखक , विचारवंतांचा मोदींच्या भाषणावर बहिष्कार

इल्हान उमर, रशिदा तलाईब, अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ आणि जेमी रस्किन यांच्यासह प्रसिद्ध अमेरिकन खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या संयुक्त काँग्रेसच्या भाषणाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने त्यांच्या निर्णयाचा आधार म्हणून धार्मिक अल्पसंख्याकांना दडपले आहे.

मुस्लिम भेदभावावर सवाल, मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बायडन यांना भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत होणाऱ्या भेदभावावर प्रश्न विचारण्यात आला. वॉशिंग्टन पोस्टच्या महिला पत्रकारांने हा प्रश्न विचारला, त्यावर आम्ही लोकशाही मूल्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असे उत्तर यावेळी बायडन यांनी दिल. त्यानंतर हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला. भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला जाते. ते थांबवण्यासाठी तुमचं सरकार काय पावलं उचलत आहे, असा सवाल विचारण्यात आला.त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, “तुम्ही म्हणता की , तुम्ही ऐकलंय की भारत लोकशाही देश आहे. ऐकलं नाही, भारत लोकशाहीच देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. संविधानाच्या रुपात आमच्या पूर्वजांनी त्याला शब्दस्वरूप दिलं आहे. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला आमच्या लोकशाहीत जागा नाही.

भारतात कुठलाही भेदभाव नाही…

ज्या ठिकाणी मानवी मूल्यांना जागा नाही तिथं लोकशाही असू शकत नाही. धर्म किंवा जातीच्या आधारे भारतात कुठलाही भेदभाव नाही. सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांना दिला जात आहे, त्यात कुठलाही भेदभाव केला जात नाही.” यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून निवेदन देण्यात आले. दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन यावेळी दिले. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध फार महत्त्वाचे आहेत. आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, असे यावेळी बायडन यांनी म्हटले आहे.

भारतात आणखी दोन दूतावास

यावेळी भारतात दोन आणखी वाणिज्य दुतावास सुरू करणार असल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे. मोदींनी यावेळी बायडन यांचे आभार मानले. दोन्ही देशांमधली भागिदारी संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. ही एक मजबूत आणि भविष्याला लक्षात घेऊन केलेली भागीदारी आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले. अमेरिकेत राहाणारे भारतीय आमच्या दोन्ही देशांमधल्या संबंधाचं द्योत्यक आहे, असं मोदी यांनी म्हटलंय. तसंच बेंगलुरू आणि अहमदाबादमध्ये दोन नवे वाणिज्य दुतावास सुरू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे मोदींनी स्वागत केले आहे. भारत अमेरिकेतल्या सिएटलमध्ये वाणिज्य दुतावास सुरू करेल, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली आहे.

आमच्या रेल्वेच्या डब्यात ऑस्ट्रेलिया फिरतो….

“दोन्ही देश खाद्य सुरक्षा आणि ऊर्जा संकट (जे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झाले आहे.) या विषयांपासून हवामान बदलाच्या क्षेत्रापर्यंत एकत्रित काम करत आहोत.” बायडन यांनी पुढे म्हटले, “भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासमोर आज असा काळ आहे, जेव्हा सर्व काही वेगाने बदलत आहे. अशी संधी दशकातून एकदाच येते आणि आम्हाला माहीत आहे की, आज आम्ही जो निर्णय घेऊ त्याचा परिणाम येणाऱ्या काळावर दिसून येईल.” तर मोदी म्हणाले पर्यावरणाच्या दृष्टीने आम्ही विशेष काळजी घेत आहोत. आमची रेल्वे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे .आमच्याकडे कुठलेही प्रदूषण नाही. आमच्या रेल्वेच्या एकेका डब्ब्यात ऑस्ट्रेलिया फिरतो.

द्विपक्षीय चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत अमेरिकेतील प्रसिद्ध म्युझिक बँड पेन मसालाने छय्यां-छय्यां, जश्न-ए-बहारासारख्या बॉलिवूड गाण्यांनी करण्यात आले. मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर बायडन यांच्या कॅबिनेटसोबतही भेट घेतली.

मोदींनी सांगितली तीस वर्षांपूर्वीची आठवण

व्हाईट हाऊसमधील बायडन यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलताना नरेंद्र मोदी यांनी तीस वर्षांपूर्वीची आठवण सांगितली. नरेंद्र मोदींनी म्हणाले , “तीस वर्षांपूर्वी मी एखाद्या सामान्य भारतीयाप्रमाणेच इथे आलो होतो. तेव्हा मी बाहेरून व्हाईट हाऊस पाहिले होते . पण आज मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने भारतीय वंशाच्या लोकांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले करण्यात आल्याचे पाहत आहे.” भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत. या दोन्ही देशांची राज्यघटनाही एकाच शब्दाने सुरू होते- वुई द पीपल.

विविधतेत असलेल्या एकतेचा अभिमान

आताच्या परिस्थितीत दोन्ही देशांना आपल्या विविधतेत असलेल्या एकतेचा अभिमान आहे. मोदी पुढे म्हणाले , “कोव्हिडच्या काळानंतर जागतिक व्यवस्था नव्याने आकाराला येत आहे. या काळात भारत आणि अमेरिकेची मैत्री जागतिक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टिने पूरक ठरेल. जगाच्या हितासाठी शांतता आणि स्थैर्य़ आवश्यक आहे. त्याच दिशेने काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत.” “आम्ही दोन्ही देशांतील प्रश्नांव्यतिरिक्त जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा करू. ही चर्चा सकारात्मक होईल, असा विश्वास मला आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!