Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MPSCResultUpdate : “एमपीएस”सीत खुल्या वर्गात प्रमोद चौगुले , मुलींमध्ये सोनाली म्हात्रे तर मागासवर्गीयात विशाल यादव सर्वप्रथम

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये चौगुले प्रमोद बाळासाहेब हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून म्हात्रे सोनाली अर्जुनराव या महिलांमधून तसेच यादव विशाल महादेव हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.

संपूर्ण यादी वाचण्यासाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या…

http://mpsc.gov.in/downloadFile/english/7253

http://mpsc.gov.in/downloadFile/english/7254

पदांच्या संख्येत अखेर वाढ

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील ३४० पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.एमपीएससीकडून ११ मे २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही जाहिरात केवळ १६१ पदभरतीची असल्याने परीक्षार्थीकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!