दिल्ली विद्यापीठातही “इंडिया: द मोदी क्वेश्चनचे” स्क्रीनिंगची तयारी , प्रशासनाकडून मात्र बंदी

बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या वादग्रस्त डॉक्यूमेंट्रीचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्यांदा हैदराबाद विद्यापीठात हि डॉक्यूमेंट्री प्रदर्शित करण्यात अली होती. त्यानंतर जेएनयू आणि जामियामध्ये स्क्रीनिंगवरून गोंधळ झाला आणि आता दिल्ली विद्यापीठात बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता दिल्ली विद्यापीठातही यावरून गदारोळ होऊ शकतो.
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), काँग्रेसची विद्यार्थी शाखा, भीम आर्मी आणि इतर अनेक विद्यार्थी संघटनांनी नॉर्थ कॅम्पस कला विद्याशाखेच्या बाहेर शुक्रवारी संध्याकाळी ४ आणि ५ वाजता फॅकल्टीच्या बाहेर “इंडिया: द मोदी क्वेश्चन” चे स्क्रीनिंग करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान डीयू प्रशासनाने स्क्रीनिंग थांबविण्यासाठी खबरदारी घेतल्याचे म्हटले आहे.
दिल्ली विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकृत निवेदनानुसार या डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. प्रशासनाने सांगितले की, डॉक्यूमेंट्रीसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही आणि कॅम्पसमध्ये परवानगी दिली जाणार नाही. कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आमच्याकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. जर कॅम्पसच्या बाहेर डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग होत असेल तर त्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
IndiaNewsUpdate : अन्नू कपूर रुग्णालयात दाखल , प्रकृती स्थिर
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055