IndiaNewsUpdate : भाजप नेत्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या

विदिशा : आपल्या दोन मुलांच्या असाध्य आजाराने त्रस्त, भाजप नेते संजीव मिश्रा यांनी मध्य प्रदेशातील विदिशा शहरात गुरुवारी संध्याकाळी पत्नी आणि दोन्ही मुलांसह सल्फा सेवन केल्याचा आरोप आहे. यामुळे चौघांचाही मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या भाजप नेत्याची दोन्ही मुले ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) या असाध्य आजाराने त्रस्त होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
भाजपचे विदिशा मंडल अध्यक्ष सुरेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, येथील बंटी नगर भागात राहणारे मिश्रा सध्या भाजपच्या विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते. ते पक्षाचे माजी नगरसेवकही राहिले आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात ते म्हणाले होते की, “देवाने हा ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आजार शत्रूच्या मुलांनाही देऊ नये.” याबाबतचे वृत्त समजताच ओळखीचे लोक घरी पोहोचले तेव्हा त्यांना 45 वर्षीय संजीव मिश्रा, त्यांची 42 वर्षीय पत्नी नीलम मिश्रा आणि दोन मुले, 13 वर्षीय अनमोल आणि सात वर्षीय सार्थक बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलीस काय म्हणतात ?
विदिशाचे जिल्हा दंडाधिकारी उमाशंकर भार्गव म्हणाले की , “मिश्राच्या दोन्ही मुलांना डीएमडी हा अनुवांशिक आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही.” त्यांनी सांगितले की घटनास्थळी एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. त्यात मिश्रा यांनी लिहिले आहे की, आपण आपल्या मुलांना वाचवू शकत नाही, त्यामुळे आता जगण्याची इच्छा नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर यादव यांनी सांगितले.डीएमडी हा स्नायूंच्या कमकुवततेशी संबंधित आनुवंशिक आणि गंभीर आजार असून तो काळाबरोबर वाढत जातो. डीएमडीचा प्रामुख्याने मुलांवर परिणाम होतो.