ShirdiNewsUpdate : साईबाबांच्या चरणी आठ दिवसात रेकॉर्डब्रेक दान …
शिर्डी : शिर्डीच्या साईं संस्थानला एका आठवड्यात सुमारे आठ लाख भाविकांनी भेट दिली असून २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत साईबाबांच्या दानपेटीत ८ कोटी ७८ लाख ७९ हजार रूपये जमा झाले असल्याचे वृत्त आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्यानंतर नविन वर्षानिमित्त भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
या वृत्तानुसार २५ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात दानपेटीत ८ कोटी ७८ लाख ७९ हजार, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ६७ लाख ६७ हजार 698 रुपये, डेबीट आणि क्रेडीट कार्डद्वारे २ कोटी १५ लाख १८ हजार रूपये, ऑनलाइन देणगी १ कोटी २१ लाख रूपये, मनिऑर्डरद्वारे ३२ लाख रूपये, ९० लाख ३१ हजार रुपयांचे १ किलो ८४९ ग्राम सोने आणि ६ लाख रुपयांच्या १६ किलो चांदी जमा झाली आहे.
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि त्यानंतर नवीन वर्षानिमित्त ८ लाख ७० हजार २८० भक्तांनी मोफत भोजनाचा लाभ लाभ घेतलातसेच या कालावधीत सशुल्क आरती आणि दर्शनपासद्वारे साई संस्थानला ४ कोटी ५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान लाडू विक्रीद्वारे संस्थानला १ कोटी ३२ लाख रूपये आणि निवास व्यवस्थेतून संस्थानला १ कोटी ४४ लाख रूपयांचं उत्पन्न मिळालं आहे. या शिवाय आठ दिवसांच्या कालावधीत १७१ रक्तदात्यांनी या काळात रक्तदान केले आहे. संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आज गेल्या आठ दिवसांतील रक्कम मोजली तेंव्हा एकूण रकमेचा आकडा संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.