Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MIMNewsUpdate : नगरचे नामांतर , वंचित – सेना संभाव्य युती , आणि लव्ह जिहादवर काय बोलले असदुद्दीन ओवैसी ?

Spread the love

औरंगाबाद  : अहमदनगरचे नामांतर , वंचित – सेना संभाव्य युती , आणि लव्ह जिहाद या विविध मुद्यांवर एमआयएमचे  नेते खा. असदुद्दीन ओवैसी  यांनी आपल्या रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत .  नामांतरासारख्या  भावनिक मुद्यांवर बोलण्यापेक्षा ओवैसी यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.


अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे अशी मागणी केली जात आहे. या  मुद्द्यावर बोलताना खा.  ओवैसी म्हणाले की , अरे तुम्ही नोकरी द्या, रोजगार द्या. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ढासळत आहेत. आज पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत आणि  तुम्हाला फक्त नावांची काळजी लागली आहे. कामाची काळजी करायला हवी. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? सरकार चालवण्यात अपयश येत असल्यामुळे हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत.

वंचित -शिवसेना संभाव्य युती …

दरम्यान ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या युतीवर बोलताना ते म्हणाले की , प्रकाश आंबेडकर , उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो. आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश होता. देशातील वंचितांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो ?

लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत…

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की , “लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. प्रेम ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. तर जिहाद हा देखील वेगळा विषय आहे. तलवार उचलून कोणालाही मारून टाकणे, म्हणजेच जिहाद असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे. भारतात १८ वर्षे झालेल्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या मनाने जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर कोणालाही त्याबाबत आक्षेप नसावा. ज्या-ज्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा करण्यात आला. ते सर्व कायदे असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने सांगितलेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!