CongressNewsUpdate : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात …भारत जोडो यात्रा सोडून प्रियांका आईच्या भेटीला …
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांवेळ प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भात रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी माहिती दिली. ‘यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनवर देखरेख आणि उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.स्वरुप यांनी दिली. दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेतून परतल्या आहेत.
मंगळवारपासूनच सोनिया गांधींची प्रकृती खराब होती, त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या ‘भारत जोडो यात्रेतून परत आले होते. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज सकाळी ६ वाजता बागपतमधील मावी कलान येथून पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही माहिती मिळताच प्रियांका गांधी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी बुधवारी राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी झाल्या नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा सकाळी दिल्लीहून मावी कलान येथे पोहोचले आणि पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार सकाळी ६ वाजल्यापासून यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. पण आज सकाळी प्रियांका गांधी यात्रेत सहभागी झालेल्या नाहीत, असं काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रवक्ते अंशू अवस्थी म्हणाले.काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी दुपारी गाझियाबाद येथील लोनी बॉर्डरपासून उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाली होती. ही यात्रा गुरुवारी हरियाणासाठी रवाना होईल.